शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

'देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींनी द्यावेत?

By महेश गलांडे | Updated: February 8, 2021 16:05 IST

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या

ठळक मुद्दे सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. तसेच, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच असून शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. त्यानंतर, काँग्रेसनेही मोदींवर टीका केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवरुन प्रश्नांची मालिकाच लावली आहे. देशवासीयांचे डोळे उघडणाऱ्या या प्रश्नांची उत्तर द्या, असे म्हणत पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर का आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी विचारला आहे. सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, शेतीवर टॅक्स, खतांवर टॅक्स, किमान आधारभूत किंमत यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

1. मोदी सरकारने सत्तेवर विराजमान होताच 12 जून 2014 रोजी राज्यांद्वारे आधारभूत किंमतीवर अधिकतम देण्यात येणाऱ्या 150 रुपयांचा बोनस आपण बंद केला, हे खरं नाही का? 2. डिसेंबर 2014 मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या भूमी अधिग्रहनसाठी योग्य दाम देणाऱ्या कायद्याला एकापाठोपाठ एक असे तीन अध्यादेश आणून भांडवलदारांच्या हितासाठी बदलण्याचा प्रयत्न केला, हे खरं नाही का?3. फेब्रुवारी 2015 मध्ये आपण सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देऊन, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्क्यापेंक्षा अधिक किमान आधारभूत किंमत दिल्यास बाजारात विसंगती येईल, असं सांगितलं, हे खरं नाही का? याचाच अर्थ तुम्ही भांडवलदाराच्या बाजूने उभे होतात. 4.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून 2016 पासून 2019 पर्यंत खासगी कंपनींना 26,000 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यात आला, हे खरं नाही का? अन्यथा तो पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असता. 5. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिल्याचं ढोल वाजवून सांगत आहात. पण, दुसरीकडे 15,000 प्रति हेक्टर शेतीवर टॅक्स लावण्यात आलाय. त्याचं काय?6. गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदाच शेतीवर टॅक्स लागलाय, हे खरं नाही का?. खतांवर 5 टक्के आणि किटकनाशक, औषधांपासून ते कृषी यंत्रावर 12 टक्के ते 18 टक्के टॅक्स लावण्यात आलाय. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाल यांनी ट्विट करुन प्रश्नांची मालिकाच जनतेसमोर ठेवली आहे. या प्रश्नातून मोदींना सवाल करण्यात आला आहे. मोदींनी राज्यसभेत दिलेल्या भाषणानंतरची ही काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्येही हॅशटॅग असे लिहिले आहे.  

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन