शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द होणार का? काय आहे ११ खासदारांचे १८ वर्षांपूर्वीचे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 19:29 IST

महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाऊ शकते का? यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून सध्या राजकारण तापले आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांची तक्रार आचार समितीकडे पाठवली आहे. तसेच, निशिकांत दुबे यांनी लोकपालांकडेही तक्रार केली आहे. 

दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांची पार्टी टीएमसीने या संपूर्ण घटनेपासून स्वतःला लांब ठेवले आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला असून 2005 च्या घटनेचा उल्लेख केला आहे. काय आहे ती 18 वर्षे जुनी घटना? त्याच पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाऊ शकते का? यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या...

काय आहे ती घटना?२००५ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात यूपीए सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात एक स्टिंग समोर आले आणि खळबळ उडाली होती. कोब्रा पोस्ट नावाच्या डिजिटल पोर्टलने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंग ऑपरेशनचे टायटल 'ऑपरेशन दुर्योधन' असे होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही खासदार पैशाच्या बदल्यात एका कंपनीला प्रोमोट करण्यासाठी आणि संसदेत प्रश्न विचारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले होते.

व्हिडिओ आणि ऑडिओ टेप्स गोळा केल्याचा दावा8 महिन्यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर ५६ व्हिडिओ आणि ७० ऑडिओ टेप्स गोळा केल्याचा दावा पोर्टलने केला होता. या स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या खासदारांची नावे समोर आली, त्यापैकी सहा खासदार भाजपचे होते. तर एक खासदार (मनोज कुमार) आरजेडीचा आणि एक काँग्रेसचा होता. १२ जानेवारी २०२५ रोजी एका वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन ऑन एअर केले होते.

लगेच संसदीय समितीची स्थापनादरम्यान, स्टिंग ऑपरेशन ऑन एअर झालेल्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी घाईघाईने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती स्थापन केली. काँग्रेस नेते पवन बन्सल हे या समितीचे अध्यक्ष होते. तर भाजपचे विजयकुमार मल्होत्रा, सीपीएमचे मोहम्मद सलीम, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि काँग्रेसचे सी कुप्पुसामी यांचा सदस्य म्हणून समावेश होता.

११ सदस्यांची रद्द झाली होती खासदारकी या समितीच्या तपासाच्या आधारे तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत प्रस्ताव मांडला होता. ज्यामध्ये या खासदारांचे वर्तन अनैतिक असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे म्हटले होते. हा प्रस्तावही मंजूर झाला. ११ सदस्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मात्र, याला भाजपकडून तीव्र विरोध दिसून आला होता. त्यावेळी भाजप खासदारांनी सभात्याग केला होता. तेव्हा लालकृष्ण अडवाणींनी या निर्णयाला 'कॅपिटल पनिशमेंट' असे म्हटले होते. पुढे हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राParliamentसंसद