शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

Maharashtra Election : काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यासंदर्भात काँग्रेसने व्यैयक्तिक सुनावणीची मागणीही केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील मतदारांच्या डेटावर एका माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनीही प्रश्न उपस्थित केल्याचेही," काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "मनमानी पद्दतीने हटविण्याच्या आणि जोडण्याच्या या प्रक्रियेत जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 47 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. 50 विधानसभा मतदारसंघांपैकी जेथे सरासरी 50,000 नवीन मतदार जोडले गेले, तेथे सत्ताधारी आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 47 जागा जिंकल्या आहेत."

मतदानाचा टक्का अचानक वाढल्यावर प्रश्नचिन्ह -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने म्हटले आहे की, "21 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 58.22% होती, जी रात्री 11:30 पर्यंत 65.02% झाली. तसेच, अंतिम अहवालात 66.05% मतदानाची नोंद झाली." या पत्रानुसार, केवळ एका तासात म्हणजे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अंदाजे 76 लाख मतदान झाले आहे.

ईव्हीएमवरही आक्षेप - ईव्हीएमसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. "आम्हाला ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवे आहेत," असे खर्गे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४