मोदींच्या नव्हे, तर पवारांच्या सभा घेणार का?-जावडेकर
By Admin | Updated: October 6, 2014 04:22 IST2014-10-06T04:22:03+5:302014-10-06T04:22:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत

मोदींच्या नव्हे, तर पवारांच्या सभा घेणार का?-जावडेकर
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा घ्यायच्या का? अशी टीका केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत केली.
ते म्हणाले की, मोदींच्या सभांवर आक्षेप घेणे हे एखाद्या संघाला त्यांच्या कर्णधाराशिवाय खेळण्याची अट घालण्यासारखा प्रकार आहे. भाजपाकडे स्थानिक नेतृत्वाची वानवा असल्याने मोदींचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी फेटाळून लावली. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी एक विशिष्ट नाव पुढे केले नाही.