शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चीनला शह; भारत-आखात रेल्वेमार्ग, युराेपातील व्यापार हाेणार सुपरफास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 05:55 IST

चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या पुढाकाराने एक ऐतिहासिक घाेषणा करण्यात आली. भारत-आखाती देश-युराेप या आर्थिक काॅरिडाेरची घाेषणा पंतप्रधान माेदींनी केली. या तीन भागांना जलमार्ग तसेच रेल्वेमार्गाने जाेडण्यात येईल. भारत या देशांशी आर्थिक काॅरिडाॅरच्या माध्यमातून जाेडला गेल्यामुळे या भागातील व्यापारातील अनेक अडचणी दूर हाेतील. विशेषत: चीनच्या वर्चस्वाला यातून शह मिळेल. 

भारत, आखात आणि युराेप हे रेल्वेमार्गाद्वारे थेट जाेडल्याने व्यापार ४० टक्के गतिमान हाेईल. ही एक ऐतिहासिक भागीदारी असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांच्यासह सर्वच युराेपियन राष्ट्रप्रमुखांनी याचे स्वागत केले आणि ही याेजना यशस्वीरीत्या पूर्ण हाेईल, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चीनचे महत्त्वाचे दाेन प्रकल्प आहेत. ‘बेल्ट ॲंड राेड इनिशिएटीव्ह’ आणि ‘चीन-पाकिस्तान आर्थिक काॅरिडाेर’. या दाेन याेजनांना जी२० तून उत्तर देण्यात आले आहे.

हे देश सहभागी : भारत, युएई, साैदी अरब, युराेपियन महासंघ, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका.

जैव इंधन आघाडी nवाहनांमुळे हाेणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जैव इंधनाकडे जग वळत आहे. जैव इंधनाला प्राेत्साहन देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय जैव इंधन आघाडी’ स्थापन करण्याची घाेषणा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. nजी-२० अध्यक्षतेची संधी साधून भारत जैव इंधन आघाडीला प्राेत्साहन देऊ इच्छिताे. त्यादृष्टीनेच ही घाेषणा पंतप्रधान माेदींनी केली.

रेल्वे प्रकल्पाची जी-२० मध्ये घोषणा होणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने शनिवार, ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले होते, ते तंतोतंत खरे निघाले.

 

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrailwayरेल्वे