शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खासगी नोकरदार वर्गाला मोदी सरकार देणार झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 10:13 IST

खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकार झटका देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकार झटका देण्याची शक्यता आहे. जीएसटी काऊंन्सिलच्या पुढील बैठकीत याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. इंडिया टुडेच्या रिपोर्ट अनुसार, सरकार 'अप्रत्यक्ष कमाई'ला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. यासाठी आवश्यक त्या नियमांमध्ये बदल आणि प्रस्तावाला पुढील जीएसटी काऊंन्सिलच्या बैठकीत हिरवा झेंडा मिळू शकतो. ‘अप्रत्‍यक्ष कमाई’ जीएसटीच्या कक्षेत आली तर खासगी कंपन्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना रिम्बर्समेंटच्या स्वरूपात पगाराचा मोठा हिस्सा मिळतो त्यावर टॅक्स भरावा लागणार आहे.

रिम्बर्समेंट जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगने (एएआर)च्या कॅन्टिन शुल्कावर केला आहे. एएआरच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्याकडून घेतलेलं कॅन्टिन शुल्क जीएसटीच्या कक्षेत येतं. या निर्णयामुळे प्रभावित होऊन करदाता कर वाचविण्यासाठी कॅन्टिन सेवा शुल्क घेण्याचं टाळू शकतो. ज्यामुळे वेतन पॅकेजवर प्रभाव पडेल. 

‘इंडिया टुडे’ने सनदी लेखापाल मनिंद्र तिवारी यांच्या हवाल्याने म्हटलं की, एएआरचे निर्णय जीएसटी काऊन्सिलला सक्तीचं नाहीत. दोन्ही संस्था एकमेकांपासून वेगळ्या आहेत. एएआर अर्थ मंत्रालयातंर्गत काम करते तर याचे बहुतांश काम हे प्राप्तिकर विभागाशी निगडीत आहे. तर जीएसटीवर एक वेगळीच जीएसटी काऊन्सिल काम करते. तरीही जीएसटी काऊन्सिल नियमात बदल करत एएआरद्वारा करण्यात आलेल्या निर्णयांवर विचार करू शकतं.

या प्रस्तावावर नियम बनवण्याचा अर्थ असा होईल की, घर भाडं, टेलिफोन बिल, अतिरिक्त हेल्थ इन्श्युरन्स, हेल्थ चेकअप्स, जिम,मनोरंजन अशा विविध खर्चावर जीएसटी लागू शकतो. हा नियम लागू झाल्याचं कॉर्पोरेट कंपन्या अतिरिक्त जीएसटीचा खर्च कर्मचाऱ्यांवर टाकण्यासाठी त्यांच्या वेतनात बदल करु शकतो. 

टॅग्स :GSTजीएसटीNarendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारी