शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात 'कोरोना व्हायरस' वाचवणार कमलनाथ सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 15:11 IST

देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार देखील बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल. एकूणच कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  

नवी दिल्ली - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतीच राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश विधानसभेचे अधिवेशन कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे पुढे ढकलण्यात येऊ शकते. असं झाल्यास कोरोनामुळे कमलनाथ सरकारला काही काळ अभय मिळणार हे निश्चित.

काँग्रेसनेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 22 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले आहे. याचा लाभ घेण्याची भाजपची योजना आहे. विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी राजीनामा देणाऱ्या 22 आमदारांपैकी 13 आमदारांना नोटीस बजावली आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांनी आज किंवा उद्या उपस्थित राहून राजीनामा स्वखुशीने दिला की दडपणात हे स्पष्ट सांगावे, असं आवाहन प्रजापती यांनी केले आहे.

दरम्यान विधानसभेचे बजेट सत्र पुढं ढकलल्यास याचा कमलनाथ सरकारला फायदा होऊ शकतो. कारण सत्र सुरू होताच, भाजपकडून बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्यात येऊ शकते. या स्थितीत विद्यमान कमलनाथ सरकारकडे संख्याबळ नाही. दुसरीकडे देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कमलनाथ सरकार देखील कोरोनामुळे बजेट सत्र पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. जेणेकरून या कालावधीत नाराज आमदारांची नाराजी दूर करता येईल.एकूणच कोरोनामुळे सत्र लांबवल्यास कमलनाथ सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.