शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

'UNSC'च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताचं समर्थन करणार चीन? ड्रॅगनचे सूर बदलले, पहिल्यांदाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 02:49 IST

आपण सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या आकांक्षां समजू शकतो आणि त्यांचा सन्मान करतो, असे चीनने म्हटले आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि भारत दौऱ्यावर असलेले चीनचे कार्यकारी उप-परराष्ट्र मंत्री मा झाओक्सू यांच्यात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत, विषेशत्वाने सीमाभागातील शांतता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, आपण सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या आकांक्षां समजू शकतो आणि त्यांचा सन्मान करतो, असे चीनने म्हटले आहे.

यावेळी, दोन्ही देशांनी, सीमाभागातील शांतता टिकवण्यासाठी भारत-चीन संबंध स्थिर राहणे अत्यंत आवश्यक आहे, यावर भर दिला. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान ब्रिक्स (BRICS) शेरपा बैठकीसाठी मा झाओक्सू भारत दौऱ्यावर आहेत. या बैठकीत विक्रम मिसरी यांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात भाष्य केले. तसेच तिच्या विस्ताराबाबत आशा व्यक्त केली.

लोकांचा संपर्क वाढवण्यावर सहमती -दोन्ही देशांनी 'एअर सर्व्हिस ॲग्रीमेंट' लवकरात लवकर अंतिम करण्यावर भर दिला. याशिवाय, व्हिसा सुविधा सुलभ करणे आणि लोकांमधील संवाद वाढवण्यासाठी व्यावहारिक पावले उचलण्यावरही सहमती झाली. आंतरराष्ट्रीय परिस्थितीतील गुंतागुंतीचे बदल लक्षात घेता, राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करावे, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

दरम्यान, गळवान संघर्षानंतर भारत आणि चीनमधील तणाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गळवान वादामुळे बंद झालेल्या सेवा आता पुन्हा हळू-हळू सुरू होत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेत, संवेदनशील मुद्द्यांवरील चिंता दूर करून संबंध पुढे नेण्यासंदर्भात चर्चा झाली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी यावेळी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : China softens stance on India's UNSC bid, signals support.

Web Summary : China indicates understanding, respect for India's UNSC aspirations during talks focusing on border peace. Discussions also covered resuming Kailash Manasarovar Yatra, easing visa processes, and boosting people-to-people contact, aiming to improve bilateral relations after Galwan tensions.
टॅग्स :Indiaभारतchinaचीन