शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:04 IST

Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. हे निकाल आम आदमी पक्षाला धक्का देणार आहेत. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत 'आप'ला २३ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ४७ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. अशातच, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

भाजप उमेदवार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

नवी दिल्ली जागेची 'जादू' -महत्वाचे म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्ली जागेवर ज्या उमेदवाराचा विजय झाला, तोच उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. २०१३ मध्ये त्यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. याच जागेवरून शीला दीक्षितही एकदा निवडून आल्या होत्या. यापूर्वी त्या गोल मार्केट मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या होत्या. २००८ मध्ये सीमांकनानंतर गोल मार्केट जागेचे नाव बदलून नवी दिल्ली, असे करण्यात आले. 

प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट -प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली, असे मानले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.

प्रवेश वर्मा यांनी आपल्या विजयानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जय श्री राम लिहिले आहे. तसेच, "दिल्लीत हे जे सरकार येत आहे, ते पंतप्रधानांचे व्हिजन घेऊन येत आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. दिल्लीतील जनतेचा विजय आहे," असेही वर्मा यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीAam Admi partyआम आदमी पार्टी