सॅलिसबरी पार्क येथील जागेचे होणार पुनर्मुल्यांकन
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:17+5:302015-02-16T23:55:17+5:30
पुणे : सॅलिसबरी पार्क येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली ७० हजार चौ.फुट जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल 65 कोटी रूपयांचे मुल्यांकन करण्यात आले हे. हे मुल्यांकन चुकीचे असल्याने तसेच ही जागा पुन्हा मुळ मालकास परत देण्यासाठी एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन केले गेले असल्याची टिका होत असल्याने या जागेचे पुनर्मुल्यांकन करण्याचे आदेश सोमवारी स्थायी समितीने महापालिका प्रशासन दिले. 2008 मध्ये या जागेचे एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन कसे झाले असा सवाल उपस्थित केला गेल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी यांनी स्पष्ट केले.

सॅलिसबरी पार्क येथील जागेचे होणार पुनर्मुल्यांकन
प णे : सॅलिसबरी पार्क येथील उद्यानासाठी आरक्षित असलेली ७० हजार चौ.फुट जागा ताब्यात घेण्यासाठी तब्बल 65 कोटी रूपयांचे मुल्यांकन करण्यात आले हे. हे मुल्यांकन चुकीचे असल्याने तसेच ही जागा पुन्हा मुळ मालकास परत देण्यासाठी एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन केले गेले असल्याची टिका होत असल्याने या जागेचे पुनर्मुल्यांकन करण्याचे आदेश सोमवारी स्थायी समितीने महापालिका प्रशासन दिले. 2008 मध्ये या जागेचे एवढया मोठया प्रमाणात मुल्यांकन कसे झाले असा सवाल उपस्थित केला गेल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी यांनी स्पष्ट केले. ही जागा गेली वीस वर्षे उद्यानासाठी आरक्षित होती. या जागेवर २०११ मध्ये निवासी आरक्षण करण्याचा घाट यापूवीर्ही घातला गेला होता. मूळ मालक व महापालिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या आदेशानुसार याठिकाणी उद्यानाचे आरक्षण कायम ठेवले गेले. तसेच पालिकेकडून तब्बल साडे सहा कोटी रुपए भरण्यात आले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयात जागा मालकाने रिट पिटीशन दाखल केल्यानंतर भूसंपादनाची सुमारे 65 कोटी रूपये भरण्यास महापालिका तयार आहे की नाही याबाबत न्यायालयाने विचारणा केली होती. तसेच शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडून याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतू, या प्रस्तावावर अपेक्ष घेत मूळ मालक व शासकीय अधिका-यांनी या जागेची रक्कम बाजारभावापेक्षा दहापटीने वाढवून ६५ कोटी रुपए केली असल्याचा स्थानिक नागरीकांचा आरोप आहे. तसेच महापालिकेस हा मोबदला देणे शक्य नसल्याने ही जागा पालिकेच्या हातातून जाणार असल्याने त्या विरोधात नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्णेगुरूजी म्हणाले.================कलाग्रामसाठी 82 लाखांच्या निधी मंजूर सिंहगड रस्त्यावरील पु.ल देशपांडे उद्यानाच्या तिस-या टप्प्यात उभारण्यात येणा-या कलाग्रामच्या कामासाठी तब्बल 82 लाख रूपयांचा निधीस समितीने मान्यता दिली आहे. राजधानी दिल्ली मधील हस्तकलांच्या साहित्यासाठी प्रसिध्द असलेल्या दिल्ली हटच्या धर्तीवर हे कलाग्राम उभारले जाणार आहे. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षभरात त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.====================