केंद्रात होणार खांदेपालट ?
By Admin | Updated: November 9, 2015 03:33 IST2015-11-09T03:33:30+5:302015-11-09T03:33:30+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीचा थेट परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळात दिसणार, असे संकेत आहेत. बिहारमधून मंत्रिमंडळात असलेल्यांना बाजूला सारून त्यांची जागा उत्तर प्रदेश व आसाममधील नेत्यांनी भरली जाऊ शकते.

केंद्रात होणार खांदेपालट ?
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा थेट परिणाम केंद्रीय मंत्रिमंडळात दिसणार, असे संकेत आहेत. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानली, तर बिहारमधून मंत्रिमंडळात असलेल्यांना बाजूला सारून त्यांची जागा उत्तर प्रदेश व आसाममधील नेत्यांनी भरली जाऊ शकते. विधानसभा निवडणुकांच्या यादीत आता आसाम आणि उत्तर प्रदेश आहे हे त्याचे कारण.
निकालानंतर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारे असतील, असे म्हटले आहे. या निकालांनी देशपातळीवर मतदारांसमोर भाजपला ठोस असा पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे, असे यादव नितीशकुमारांचे म्हणणे. यामुळे उत्तर प्रदेश व आसाममधील निवडणुका भाजप व त्याच्या मित्रपक्षांसाठी खूपच महत्त्वाच्या असतील. या पार्श्वभूमीवर तेथील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन जनमत अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.