शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्तीने महिलेला घरात चिरडून ठार मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 06:49 IST

आरतीबाईच्या पतीला तात्काळ २५ हजार रुपये मदत दिली गेली व राहिलेली ५.७५ लाख औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिले जातील, असे चौबे म्हणाले.

कोरबा (छत्तीसगड) : तिहाईपाडा लामणा (जिल्हा कोरबा) खेड्यात जंगली हत्तीने आरतीबाई (३५, रा. पाली, जिल्हा छत्तीसगड) हिला सोमवारी मध्यरात्री चिरडून ठार मारले, असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

आरतीबाई व तिचा पती तिहाईपाडा लामणात नातेवाईकांकडे आले होते. हत्तीने भिंत तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व हे जोडपे झोपले होते तिकडे हल्ला केला. तिचा पती घराबाहेर पळाला; परंतु हत्तीने सोंडेने आरतीबाईला पकडले व जमिनीवर आदळून चिरडले, असे वन विभागाचे अधिकारी अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले. जखमी अवस्थेत तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. काही वेळेतच वन विभाग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले.

आरतीबाईच्या पतीला तात्काळ २५ हजार रुपये मदत दिली गेली व राहिलेली ५.७५ लाख औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिले जातील, असे चौबे म्हणाले.२ जून रोजी पासनमध्ये (जिल्हा कोरबा) हत्तीने एका पुरुषाला ठार मारले होते. दाट जंगल असलेल्या उत्तर छत्तीसगड विभागातील सूरगुजा, कोरबा, रायगढ, जाशपूर आणि कोरिया जिल्ह्यांत हत्ती आणि मानव यांच्यात संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत.गेल्या काही वर्षांत झालेल्या या संघर्षात अनेक लोक ठार झाले, तर किती तरी घरे व पिकांची जंगली हत्तींनी नासधूस केली आहे.बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांची मुलगी ठारच्बहारीच (उत्तर प्रदेश) : कटारनियाघाट वन्यजीव अभयारण्याजवळ असलेल्या धोबियानपूर खेड्यात सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांची मुलगी ठार झाली. मुलगी तिच्या घराबाहेर असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला, असे विभागीय वन अधिकारी जी.पी. सिंह यांनी मंगळवारी सांगितले.च्बिबट्याने मुलीला पकडले होते व तो तिला जंगलात घेऊन जाण्याच्या प्रयत्नांत होता. तेवढ्यात ग्रामस्थ आले व त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने तिला तेथेच टाकले व तो जंगलात पळाला, असे सिंह म्हणाले. मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ग्रामस्थांना त्यांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, असे आधीच सांगण्यात आलेले असल्याचे ते म्हणाले.४ जून रोजी बिबट्याने दल्लापुरवा खेड्यात तीन वर्षांच्या मुलाला ठार मारले होते व त्याचदिवशी पाथागौडी भागात वन विभागाचा एक कर्मचारी आणि दोन पोलिसांसह सात जणांना जखमी केले होते. नंतर या बिबट्याला वन विभागाने पकडले.

टॅग्स :Deathमृत्यू