शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेच्या धर्मात बदल होत नाही - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:44 IST

लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलत नाही, असे सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

नवी दिल्ली - लग्नानंतर पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलत नाही, असे सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान म्हटले आहे. शिवाय, सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर असहमतीदेखील व्यक्त केली आहे. लग्नानंतर संबंधित महिला तिच्या पतीच्या धर्माची होते, असे हायकोर्टानं म्हटले होत. मात्र, हायकोर्टाच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं असहमती दर्शवली आहे. 

काय आहे नेमके प्रकरण ?लग्नानंतर पतीचा धर्म असेल तोच त्याच्या पत्नीचाही होतो, असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं असहमती दर्शवली आहे. पारसी समुदायात एका महिलेनं दुस-या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केले. यामुळे संबंधित महिलेला तिच्या पालकांच्या अंत्यसंस्कार विधित सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. गुलरोख एम. गुप्ता असे या महिलेचं नाव आहे. गुलरोखला 'टॉवर ऑफ सायलेन्स'पर्यंत जाण्याची परवानगी दिली गेली नाही. टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे जेथे पार्थिव अंतिम काही क्षणांकरिता ठेवण्यात येते.  या महिलेनं दुस-या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न केल्यानं जोरोऑस्ट्रियन ट्रस्टनं तिला टॉवर ऑफ सायलेन्सपर्यंत जाण्यापासून रोखले होते. 

दरम्यान, संबंधित महिलेला 'टॉवर ऑफ सायलेन्स'मध्ये जाण्यास परवानगी न देणारा निर्णय 'वलसाड जोरोऑस्ट्रियन ट्रस्ट'ने मागे घ्यावा, असे आदेशही दिले आहेत. लग्न झाले म्हणून कोणत्याही महिलेला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला. हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. यावेळी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावर असहमती दर्शवली. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सीकरी, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पारसी पुरुषाला पालकांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यापासून रोखले जात नाही, मग महिलेला अशी वागणूक का, असा सवाल खंडपीठाने केला. महिलेला 'टॉवर ऑफ सायलेंस'मध्ये जाण्यापासून रोखणारा असा कोणताच कायदा अस्तित्वात नाही. महिला तिच्या पतीचा धर्म स्वतःहून स्वीकारत नाही, तोपर्यंत पतीच्या धर्मानुसार महिलेचा धर्म बदलू शकत नाही, असेदेखील कोर्टानं स्पष्ट केले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय