पारसी लोकसंख्या ६० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:01 AM2017-08-02T02:01:31+5:302017-08-02T02:01:31+5:30

भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती

Parsi population decreases by 50% in 60 years | पारसी लोकसंख्या ६० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी

पारसी लोकसंख्या ६० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी

Next

मुंंबई : भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती जियो पारसी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात समोर आली आहे. पारझर फाउंडेशन आणि मेडिसन बीएमबी या संस्थांनी बॉम्बे पारसी पंचायत, टीआयएसएस, मुंबई आणि फेडरेशन आॅफ झोरास्ट्रियन अंजुमन्स आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जियो पारसी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. फोर्ट येथील के. आर. कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते. त्यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. इराणचे महावाणिज्यदूत मसूद इ खालेघी व अभिनेत्री पारिझाद कोलाह मार्शल यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. २४ सप्टेंबर २०१३ला सुरू केलेली ‘जियो पारसी’ ही मोहीम आता संपूर्ण जगासाठी विशेष उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
सप्टेंबर २०१३पासून पारशी समाजात आजपर्यंत १०१ मुले जन्माला आली आहेत. जियो पारसी मोहिमेला अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाकडून सहकार्य केले जात आहे, असेही आयोजकांनी स्पष्ट केले. या योजनेच्या मुख्य प्रवर्तक डॉ. शरनाझा कामा यांनी सांगितले की, आम्ही पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Web Title: Parsi population decreases by 50% in 60 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.