अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीची खांडोळी
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:19+5:302015-08-16T23:44:19+5:30
वर्धेतील थरार : कुत्र्यांनी मानवी अवयव पोत्यातून बाहेर काढल्याने गुन्हा उघडकीस

अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीची खांडोळी
व ्धेतील थरार : कुत्र्यांनी मानवी अवयव पोत्यातून बाहेर काढल्याने गुन्हा उघडकीसवर्धा : अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीची कुर्हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या पोत्यात बाधून फेकले. कुत्र्यांनी या पोत्यातील मानवी अवयव बाहेर काढल्याने या हत्येला वाचा फुटली. या प्रकरणी मृत पतीला अटक करण्यात आली असून त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगला मोहन वरठी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजनामाता परिसरात काही कुत्र्यांनी मानवी अवयव उचलून आणल्याचे येथील नागरिकांच्या नजरेत पडले. त्याची पाहणी केली असता तो मानवी पाय होता. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांचा शोध सुरू असताना काही अंतरावर आलोडी शिवारात महिलेचा पाय, हात व शीर आढळून आले. शीर प्लास्टिकच्या पिशवीत असल्याचे दिसून आले.ही महिला कुठली याचा शोध सुरू असताना इंदिरानगर येथील मंगला वरठी नामक महिला शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली. यावरून तिचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. महिलेच्या इतर शरीराचा शोध सुरू असताना कारला मार्गावर एका पोत्यात बांधून असलेला तिचे धड आढळले. मंगलाच्या नातलंगांनी तिची हत्या पती मोहन यानेच केल्याची तक्रार दाखल केली. यात त्यांनीही अनैतिक संबंधाचा उल्लेख केला होता. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीराच्या काही अवयवाचा तपास पोलीस रविवारीही घेत होते. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा असताना रविवारी सायंकाळी त्याने हत्येची कबुली दिली. त्याने शुक्रवारी रात्री मंगलाची हत्या केल्याचे सांगितले. मोहन नेहमी बाहेर राहत असल्याने पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबध असल्याचा संशय त्याला आला. या कारणावरून या दोघात नेहमीच वाद होत होता. त्यातूनच शुक्रवारी रात्री तिची हत्या केल्याचे पोलिसांनी त्याने सांगितले. (प्रतिनिधी)------साडीवरून मुलाने ओळखले आईला कुत्र्याने आणलेल्या मानवी अवयावरून पोलिसांनी शोध सुरू केला असता त्यांना एक साडी सापडली. ही साडी बेपत्ता असलेल्या मंगला हिच्या मुलाला दाखविताच त्याने ही साडी त्याच्या आईची असल्याचे सांगितले. यानंतर प्लास्टिकच्या थैलीत आढळलेल्या शिरावरून तिची पूर्ण ओळख पटली.