128 किलो वजनाची पत्नी अंगावर पडली, पतीसह पत्नीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 10:46 IST2016-07-05T07:41:38+5:302016-07-05T10:46:56+5:30

पाय-यांवरुन पाय घसरल्याने 128 किलो वजनाची पत्नी अंगावर पडून पतीसह पत्नीचाही मृत्यू झाल्याची विचित्र घटना राजकोटच्या कालवाड रोडवरील रामधाम सोसायटीमध्ये घडली आहे

The wife weighed 128 kg, also lost her husband's wife | 128 किलो वजनाची पत्नी अंगावर पडली, पतीसह पत्नीचाही मृत्यू

128 किलो वजनाची पत्नी अंगावर पडली, पतीसह पत्नीचाही मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
राजकोट, दि. 05 - पाय-यांवरुन पाय घसरल्याने 128 किलो वजनाची पत्नी अंगावर पडून पतीसह पत्नीचाही मृत्यू झाल्याची विचित्र घटना कालवाड रोडवरील रामधाम सोसायटीमध्ये घडली आहे. आपल्या आजारी मुलाला पाहण्यासाठी घाईत निघालेले असताना पाय-यांवरुन तोल गेल्याने ही दुर्घटना घडली आहे. 
 
68 वर्षीय मंजुला विठलानी यांचं वजन 128 किलो आहे. त्यांचा मुलगा आशिष याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी जात होत्या. पाय-यांवरुन जात असताना पाय घसरल्याने मंजुला पती नटवरलाल यांच्या अंगावर पडल्या. नटवरलाल यांच्या डोक्याला जबर जखम झाली  तर मंजुलादेखील जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दोघांचाही मृत्यू झाला आहे.
 
मंजुला आपल्या पतीसोबत तळ मजल्यावर  राहतात तर त्यांचा मुलगा आशिष आणि त्याची पत्नी निशा पहिल्या मजल्यावर राहतात. 'पहाटे 4 वाजता निशा औषध आणण्यासाठी सासू-सास-यांच्या घरी आली होती. मुलाला त्रास होत असल्याने दोघेही झोपेतून उठले आणि मुलाच्या घरी निघाले. जिन्यावरून घाईघाईने जाताना मंजुला यांचा तोल गेला आणि नटवरलाल यांच्या अंगावर पडल्या. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला', अशी माहिती राजकोट पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी दिली आहे. 
 
या दुर्घटनेत सासू-सास-यांना वाचवण्याच्या नादात निशाही पाय-यांवरुन घसरली. तिच्या पायाला जखम झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: The wife weighed 128 kg, also lost her husband's wife