पत्नीला पेटवून दिले

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30

कळमना : चार दिवसातील दुसरी घटना

The wife was burnt to death | पत्नीला पेटवून दिले

पत्नीला पेटवून दिले

मना : चार दिवसातील दुसरी घटना
नागपूर : घरगुती वादातून शिवीगाळ करून नवरोबाने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. कळमन्यातील नवीननगरात बुधवारी रात्री ही घटना घडली. यामुळे अनिता विष्णू कोढले (वय ३५) ही महिला गंभीर जखमी झाली.
बुधवारी रात्री ७ वाजता अनिता स्वयंपाक करीत होती. तेवढ्यात विष्णू कोढले घरी आला. त्याने तिला स्वयंपाकाच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली. मारहाणही केली. एवढेच नव्हे तर प्लास्टिकच्या डबकीतील रॉकेल अनिताच्या अंगावर ओतून तिला जळती शेगडी फेकून मारली. ती गंभीररीत्या भाजली. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या बयानात तिने झालेली घटना सांगितली. त्यामुळे कळमना पोलिसांनी विष्णू कोढले या नवरोबाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
अशा प्रकारची कळमन्यात घडलेली चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. रविवारी रात्री ९.१५ आरोपी जोगम केशव गिल्लोर (वय ३७, रा. दुर्गानगर) याने त्याची पत्नी सकिनाबाई (वय ३५) हिला दारूच्या नशेत रॉकेल ओतून पेटवून दिले होते.
----

Web Title: The wife was burnt to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.