शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"मी बॉयफ्रेंडसोबत राहणार, पण माझा सर्व खर्च नवऱ्याने करावा"; बायकोची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 10:22 IST

एका पत्नीने पतीकडे अजब मागणी केली आहे. ती म्हणते की, तिला आता त्याच्यासोबत राहायचं नाही. ती तिच्या दोन्ही मुलींना आपल्यासोबत ठेवेल आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे. पण खर्च मात्र पतीला करावा लागेल.

आजकाल विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. नवरा असो वा बायको, लग्नानंतरही लोकांचं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याच्या अनेक केसेस आपण पाहत असतो. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील आग्रा येथूनही अशीच एक घटना समोर आली आहे. एका पत्नीने पतीकडे अजब मागणी केली आहे. ती म्हणते की, तिला आता त्याच्यासोबत राहायचं नाही. ती तिच्या दोन्ही मुलींना आपल्यासोबत ठेवेल आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे. पण खर्च मात्र पतीला करावा लागेल.

पत्नी बॉयफ्रेंडसोबत राहिली तर तिला एक रुपयाही देणार नाही यावर पती ठाम आहे. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. जेव्हा महिलेने तिच्या या अजब मागणीबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. माझा आणि दोन्ही मुलींचा सर्व खर्च पतीने करावा. मला माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे. पण दोन्ही मुली पतीच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खर्चाची जबाबदारी पतीवर आहे असं ती म्हणाली. 

यावर पतीने म्हटलं की, जर ती त्याच्यासोबत राहत नाही तर मग पैसे का खर्च करायचे?. जर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत असेल तर तिचा खर्चही त्याने उचलावा. तेव्हा समुपदेशकाने पत्नीला विचारलं, तू असं का करत आहेस? बायको म्हणाली- नवरा अनेकदा कामानिमित्त बाहेर राहतो. तो मला वेळ देऊ शकला नाही. अशा परिस्थितीत मला एकटेपणा वाटू लागला. 

याच काळात ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि तो आता तिचा बॉयफ्रेंड आहे. पण तिचा बॉयफ्रेंडही आधीच विवाहित आहे. त्याला मुलंही आहेत. तो आधीच त्याच्या कुटुंबाचा खर्च भागवत आहे. अशा परिस्थितीत तो माझा खर्च उचलू शकत नाही. माझा आणि माझ्या मुलींचा खर्च माझ्या पतीने उचलावा अशी माझी इच्छा आहे.

समुपदेशक डॉ. अमित यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. पत्नी हाथरस येथील रहिवासी आहे. पत्नीला आता बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे. ती पतीकडून खर्चाचीही मागणी करत आहे. मात्र पतीला तिचा खर्च करायचा नाही. सध्या दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही. अशा स्थितीत तिला एक तारीख देण्यात आली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न