शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला रात्रीच्यावेळी प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये पकडलं; संतापलेल्या पत्नीने 'चपले'ने शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:43 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे बुधवारी संध्याकाळी पत्नीने पतीला प्रेयसीसह आग्रा येथील सिकंदरा हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये पकडले. संतापलेल्या पत्नीने दोघांनाही मारहाण करून राडा घातला. ही घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. पत्नीचा संताप पाहून प्रेयसीने तिथून पळ काढण्यात यश मिळवले. पत्नीने हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

दरम्यान, सिकंदरा भागातील एक तरुण त्याच्या प्रेयसीला 'गुरु का ताल'जवळील हॉटेलमध्ये घेऊन आला होता. हा प्रकार पत्नीला कळला आणि गोंधळ उडाला. पत्नी हॉटेलमध्ये पोहोचली. लक्षणीय बाब म्हणजे पत्नीने पतीला प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. संतापलेल्या पत्नीने दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात प्रेयसीने संधी मिळताच तिथून पळ काढला. यानंतर महिलेने एकच गोंधळ घातला. हॉटेलचे कर्मचारी देखील तेथून पसार झाले. तेवढ्यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. 

स्थानिक पोलीस निरीक्षक सिकंदर आनंद कुमार शाही यांनी सांगितले की, एका मुलीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या माहितीवरून पोलीस तिथे गेले होते. मात्र, महिलेने कोणतीही तक्रार दिलेली नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस