सेक्ससाठी नकार दिला म्हणून पत्नीने केली पतीची हत्या
By Admin | Updated: June 14, 2016 12:11 IST2016-06-14T11:19:25+5:302016-06-14T12:11:12+5:30
सेक्ससाठी नकार दिला म्हणून पतीची हत्या करणा-या पत्नीला अहमदाबाद सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सेक्ससाठी नकार दिला म्हणून पत्नीने केली पतीची हत्या
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १४ - सेक्ससाठी नकार दिला म्हणून पतीची हत्या करणा-या पत्नीला अहमदाबाद सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषी विमला वाघेलाला (५४) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम.भट्ट यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताना दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
दंडाची रक्कम भरली नाही तर, विमलाला आणखी सहा महिने तुरुंगात काढावे लागतील. विमला आणि तिचा पती नरसिन नोबेलेनगरमध्ये रहात होते. दोन नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी विमला आणि नरसिन दोघेच घरी होते. विमालाला त्यावेळी पतीबरोबर सेक्स करण्याची इच्छा झाली.
पण नरसिनची इच्छा नसल्याने त्याने सेक्ससाठी नकार दिला. विमलाला नरसिनच्या नकाराने संताप आला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. विमलाने नरसिनवर संशय घेत त्याच्यावर विवाहबाहय अनैतिक संबंधांचा आरोप केला.
संतापाच्या भराने विमलाने जवळ असलेली काठी उचलली व नरसिनच्या डोक्यावर प्रहार केले. यावेळी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नरसिनचा मृत्यू झाला. पतीची हत्या केल्यानंतर विमला सरदारनगर पोलिस स्टेशनमध्ये गेली व पतीच्या मृत्यूची माहिती दिली. या प्रकरणात विमला सुरुवातीला तक्रारदार होती. पुढे तपासात विमलानेच पतीची हत्या केल्याचे समोर आले.