शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:21 IST

आता मी माझी मुलगी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चहाचे दुकान उघडून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे असंही विशालने सांगितले. 

जमुईच्या सिकहरियात गावात काही दिवसांपूर्वी आयुषी कुमारी नावाच्या महिलेने तिचा पहिला पती विशाल दुबे याच्या उपस्थितीत नात्याने पुतणा लागणाऱ्या सचिन दुबेसोबत मंदिरात लग्न केले. या प्रकरणी आता पीडित पती विशालने अनेक खुलासे केले आहेत. 

विशाल दुबे याने सांगितले की, आयुषी आणि सचिनने मला धमकावले होते. जर मी त्यांच्या लग्नामध्ये अडथळा आणला तर मला जिवंत ठेवणार नाहीत अशी धमकी त्या दोघांनी दिली होती. जर मी या दोघांचे लग्न लावून दिले नसते तर मलाही ड्रममध्ये टाकून मारले असते. माझा जीव वाचवण्यासाठी मला या दोघांचे लग्न लावून द्यावे लागले असं त्याने म्हटलं आहे. 

तसेच मला पत्नी आयुषीच्या स्वभावात बदल झाल्याने शंका आली. त्यामुळे फ्लिपकार्टमधील नोकरी सोडून मी गावी परतण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. मी आयुषीवर लक्ष ठेवले, तिला समजावले परंतु तिने काही ऐकले नाही. मी १ वर्ष तिला समजावले परंतु ती ऐकत नव्हती. सचिन आणि आयुषी या दोघांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत मी पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु तिथे पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आयुषीला मी परत आणले. तरीही मला धमकी देण्याचे सुरूच होते असा दावा पती विशालने केला. 

दरम्यान, आयुषीच्या माहेरच्यांशी कुठलाही संपर्क नाही. मी एकटाच आहे. मुलगी आणि आईची देखभाल करतो. गाव-समाजात या घटनेवरून चर्चा होत आहे. मी आयुषीला खूप समजावले. समाज काय म्हणेल, परंतु तिने काहीही ऐकण्यास नकार दिला. आता मी माझी मुलगी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी चहाचे दुकान उघडून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे असंही विशालने सांगितले. 

पुतण्याच्या प्रेमात कसी पडली काकी?

पटनाच्या राजीव नगर येथे राहणारी आयुषी हिचे पहिले लग्न २०२१ साली विशाल दुबेसोबत झाले होते. या दोघांना ४ वर्षाची मुलगी आहे. २ वर्षापूर्वी आयुषीची ओळख गावातीलच सचिन दुबे नावाच्या युवकाशी झाली. जो नात्याने तिचा पुतण्या लागतो. या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर या नात्याचे रुपांतर प्रेमात बदलले. आयुषी आणि सचिन यांच्या लपून छपून भेटी सुरू होत्या ज्याची भनक कुटुंबाला नव्हती. १५ जूनला हे दोघे घरातून पळाले आणि परतल्यानंतर गावातील मंदिरात त्यांचे लग्न लावून देण्यात आले. दुसरीकडे पती विशालच्या आरोपावर आयुषीने पलटवार केला आहे. विशालने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तिने म्हटलं. 

टॅग्स :marriageलग्न