हैदराबाद : तेलंगणा उच्च न्यायालयाने एका पतीची क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागणारी याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, वर्षानुवर्षे काही वेगळ्या घटना क्रूरता मानल्या जाणार नाहीत. न्या. मौसमी भट्टाचार्य व बी. आर. मधुसूदन राव यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात कनिष्ठ कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पुष्टी केली. तेथेही पतीची याचिका फेटाळण्यात आली होती. २०१४ मध्ये विवाह झालेल्या जोडप्याशी संबंधित २०१७मधील हा खटला आहे. पतीचे म्हणणे आहे की, त्याची पत्नी असहयोगी, भांडखोर व वर्चस्व गाजवणारी आहे. ती अश्लील आणि घाणेरडी भाषा वापरत होती. ती घरकाम कधीही करीत नव्हती. तिने त्याचे वैवाहिक हक्क नाकारले व सरकारी कर्मचारी असूनही आर्थिक मदत केली नाही. निर्णयात न्यायाधीशांनी नमूद केले आहे की, अपीलककर्ता कोणतेही पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरला.
पत्नी भांडखोर, पण पुरावे नाहीत; घटस्फोट याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:07 IST