शहरं
Join us  
Trending Stories
1
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
2
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
3
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
4
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
5
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
6
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
7
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
8
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
11
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
12
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
13
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
14
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
15
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
16
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
17
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
18
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
20
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी

अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:38 IST

मध्य प्रदेशातील एका महिलेने करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त प्रार्थना केली नाही तर त्याला जीवदान दिलं आहे.

मध्य प्रदेशातील एका महिलेने करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त प्रार्थना केली नाही तर त्याला जीवदान दिलं आहे. राजगड येथील प्रिया हिने तिचा पती पुरुषोत्तमचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दिली. काही महिन्यांपूर्वी पुरुषोत्तमला कोरोनाची लागण झाली. बरं झाल्यानंतर, त्याला सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागला. जेव्हा त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत.

डॉक्टरांनी इशारा दिला होता की जर किडनी ट्रान्सप्लान्ट केलं नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. कुटुंबीय घाबरले होते. याच दरम्यान प्रियाने मोठा निर्णय घेतला. "जर माझी किडनी देऊन माझ्या पतीचा जीव वाचू शकतो, तर तीच माझी खरी करवा चौथ असेल" असं म्हणाली. हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आणि अहवालात स्पष्टपणे म्हटलं गेलं की प्रियाची किडनी पुरुषोत्तमच्या किडनीशी मॅच होते.

ऑपरेशनची तयारी सुरू झाली. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि काही दिवसांतच पुरुषोत्तमची प्रकृती सुधारू लागली. आता, दोघेही पूर्णपणे ठीक आहेत आणि एकत्र त्यांचं नवीन जीवन सुरू करत आहेत. पुरुषोत्तम एका मुलाखतीत म्हणाला की, "मी माझ्या पत्नीला सांगतो की, मी आता तिचा चंद्र आहे. कारण माझं आयुष्य आता तिच्यामुळे चमकत आहे."

सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच, लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. लोक या जोडप्याचं कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने "म्हणूनच पत्नीला तिच्या पतीची अर्धांगिनी म्हटलं जातं" अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या युजरने "खरं प्रेम हेच असत, ते फक्त बोलून सिद्ध होत नाही. प्रियाने केवळ प्रेम व्यक्त केलं नाही तर तिचं प्रेम खरे आहे हे सिद्धही केलं" असं म्हटलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Donates Kidney, Saves Husband: A True Love Story

Web Summary : A woman in Madhya Pradesh donated her kidney to save her husband's life after he suffered kidney failure post-COVID. Doctors successfully performed the transplant, and both are now healthy, beginning a new life together. Her selfless act is hailed as true love.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश