पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:16+5:302015-01-22T00:07:16+5:30
पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी

पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी
प ्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारीपत्नीसह पाच आरोपी अटकेत : २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीनागपूर : निवृत्तीनंतर पतीने दमडीही न देण्याचे सांगितल्यामुळे पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान जरीपटका पोलिसांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत कार्यरत रमेश रावजी देशभ्रतार यांच्या खुन प्रकरणी त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना अटक केली आहे. वंदना देशभ्रतार, तिचा प्रियकर संदीप ऊर्फ अप्पू प्रकाश झोडापे, संदीपचे साथीदार मयूर सुर्यकांत बॅनर्जी, मनीष मेश्राम, सुरज मेश्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाचही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वंदना आणि संदीप उर्फ अप्पू झोडापेचे मागील चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधाची माहिती रमेशला मिळाल्यामुळे वंदना आणि रमेशमध्ये वाद सुरू झाला. तेंव्हापासून ते बाबादीपसिंहनगर येथील घरी राहायला आले. तेथे ते दरबारही भरवायचे. याच दरम्यान मानेवाड्यातील एक महिला दरबारात येत होती. त्या महिलेसोबत रमेशचे अनैतिक संबंध असल्याची शंका वंदनाला आली. यावरून तिने रमेश सोबत वाद घातला. त्यांचा वाद विकोपाला गेला. फेब्रवारी महिन्यात रमेश सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून एक दमडीही देणार नसल्याची बतावणी वंदनासमोर केली. पतीच्या रकमेतून काहीच मिळणार नसल्याची बाब वंदनाने तिचा प्रियकर संदीपला सांगितली. त्यामुळे १ लाख रुपये देते, तूच माझ्या पतीचा काटा काढ, असे वंदनाने संदीपला सांगितले. तिने संदीपला एक लाख रुपये दिले. संदीपने इतर तीन साथीदारांच्या मदतीने रमेशच्या खुनाचा कट रचला. १६ जानेवारीला ते बाबादीपसिंहनगरात आले. त्यांनी रमेशला मारहाण करून दुपट्ट्याने त्यांचा गळा आवळून खुन केला. चोरीच्या उद्देशातून खूून करण्यात आल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आरोपींनी रमेशच्या घरातील साहित्य व सोन्याची अंगठी चोरून नेली. १७ जानेवारीला ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान जरीपटका पोलिसांनी संशयावरून रमेशची पत्नी वंदनाला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने आपणच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे कबूूल केले. (प्रतिनिधी)