शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 09:08 IST

गुरुग्राम येथील सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रितू शर्मा यांचा मृत्यू झाला आहे.

गुरुग्राम - येथील सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रितू शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेला मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

 गेल्या दोन वर्षांपासून न्यायाधीश शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच न्यायाधीशांची पत्नी आणि मुलावर हा गोळीबार केला या घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल महिपाल याला अटक करण्यात आली.  त्याला गुरुग्राम-फरीदाबाद मार्गावरुन बेड्या ठोकण्यात आल्या. महिपालनं हा प्रकार का केला, याबद्दल त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुरुग्राम पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष बोकान यांनी पीटीआयला दिली.  कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी रितू (38) मुलगा ध्रुवसह (18) शॉपिंग करण्यासाठी दुपारी 3 च्या सुमारास सेक्टर 51 मधील आर्केडिया मार्केटला गेल्या होत्या. त्यावेळी कृष्णकांत यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला हेड कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत होता, अशी माहिती डीसीपी सुलोचना गजराज यांनी दिली. 'आर्केडिया मार्केटमध्ये गोळीबार झाल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यावेळी रितू आणि ध्रुव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते,' असं गजराज यांनी सांगितलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी