विधवा महिलेला बेदम मारहाण
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:03+5:302015-02-13T23:11:03+5:30

विधवा महिलेला बेदम मारहाण
>नागपूर : सोबत चलण्यास नकार दिल्यामुळे एका आरोपीने विधवा महिलेला बेदम मारहाण केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता वाडीत ही संतापजनक घटना घडली. शिल्पा सचिन बन्सोड (वय ३०) ही महिला आठवा मैल, वाडी येथे राहते. पतीच्या निधनामुळे ती निराधार आहे. आरोपी राजेश सूर्यवंशी (वय ३२, रा. नवनीतनगर) बुधवारी सायंकाळी शिल्पाकडे आला. त्याने तिला आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. शिल्पाने नकार दिल्यामुळे संतापलेल्या राजेशने तिला बेदम मारहाण केली. शिल्पाच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.----