शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

ऑडिओ पॉर्नोग्राफीचा भारतातही मोठ्या प्रमाणावर प्रसार; शोध घेणाऱ्यांची संख्याही मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:21 IST

स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्टद्वारे सादरीकरण

नवी दिल्ली: इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील व्हिडीओ, फिल्म, सेक्स वेबसाइट पाहणारे असंख्य प्रेक्षक आहेत. मात्र, आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झालेल्या पॉर्नोग्राफीचा श्रोतृवर्ग भारत व जगामध्ये वाढत आहे. स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्म्सवर कोणाही व्यक्तीला आपले प्रोफाइल तयार करून पॉडकास्ट स्ट्रीम करण्याची सोय असल्याने ऑडिओ पॉर्नोग्राफीचा प्रसार भारतातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्याची मागणी होत आहे. (वृत्तसंस्था)

ऑडिओ पॉर्नच्या शोधात असंख्य 

देशात पॉडकास्ट स्ट्रीम करणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेतली तर स्पॉटिफाय हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपल्या पसंतीच्या गाणे, कलाकार यांच्याबद्दल माहिती घेण्याबरोबरच सेक्स स्टोरीज असा की-वर्ड टाकून ऑडिओ पॉर्नचा शोध घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये इरोटिक ऑडिओ स्टोरीजपासून सेक्शुअल ॲक्टच्या नॅरेशनपर्यंत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. 

भारतात अनेक पॉर्न वेबसाइटवर निर्बंध घातले आहेत. ९२४ पॉर्न वेबसाइटविरोधात लोकांनी माहिती-तंत्रज्ञान खात्यांकडे तक्रार किंवा न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर ६७ पॉर्न वेबसाइटवर सप्टेंबर २०२२ मध्ये बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ज्या पॉर्न वेबसाइटविरोधात तक्रार दाखल होते, त्यांच्या विरोधातच कारवाई होते असा आजवरचा इतिहास आहे. 

तक्रार केल्यास होते कारवाई

गाना, सावन, विंक, स्पॉटिफायसारखे ॲप्स मुख्यत्वे म्युझिक स्ट्रिमिंग ॲप म्हणून ओळखले जातात; पण तिथे पॉडकास्टच्या नावाखाली अश्लील गोष्टींचे ऑडिओ प्रक्षेपण चालते. अशा गोष्टींमुळे जर माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग होत असेल तर त्याबाबत तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

माहिती-तंत्रज्ञान कायदा

आता अश्लील ऑडिओ मेसेजचादेखील पॉर्नमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑडिओ सेक्स स्टोरीज ऐकविणारे ॲप अमेरिकेत २०१९ सालापासून उपलब्ध आहेत. भारतातही हे ॲप गुगल प्ले स्टोअर, ॲपल स्टोअरवर सहज मिळू शकतात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGovernmentसरकार