शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:53 IST

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, बुधवारी सकाळी 8.21 वाजता चित्र स्पष्ट झाले.

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल अन्य चार राज्यांसोबत मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र, इतर सर्व राज्यांचे निकाल जाहीर झाले तरीही मध्य प्रदेशमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक आणि रात्री 8 वाजेपर्यंत केवळ 13 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. EVM च्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निकाल जाहीर करण्यास 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, बुधवारी सकाळी 8.21 वाजता चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसला 114 आणि भाजपला 109 जागा मिळाल्या. भारतात 1998 पासून ईव्हीएमचा वापर सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 3.30 वाजताही बहुमत गाठण्यासाठी रस्सीखेच सुरुच होती. 

उशिर का झाला?मध्यप्रदेशमध्ये व्हीव्हीपॅट मशिनचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. यानुसार सर्व 230 विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी एका मतदान केंद्राला निवडण्य़ात आले होते. यामुळे ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमधील मतांचा ताळेबंद व्हीव्हीपॅट मशिनच्या पावत्यांसोबत करण्यात आला. ही मोजणी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत करण्यात आली होती. प्रत्येक फेरीनंतर प्रतिनिधींना त्याचे प्रिंटआऊटही देण्यात आले होते. या सर्व प्रक्रियेमुळे निकालाच्या घोषणेला विलंब झाला. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 14,600 कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी नेमण्यात आले होते. शिवाय भाजप आणि काँग्रेसमधील बहुमतासाठीची रस्सीखेच हे देखिल एक कारण विलंबामागे आहे. निकाल एका बाजुने लागले असते तर लवकर चित्र स्पष्ट झाले असते. 

मध्य प्रदेशमध्येच पहिल्यांदा झाला होता वापर...ईव्हीएम मशिने 1989-90 मध्येच बनविण्यात आली होती. मात्र, 1998 मध्ये मध्य प्रदेशच्या पाच, राजस्थानच्या पाच आणि दिल्लीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. मात्र, व्हीव्हीपॅट या मशिनचा वापर 2013 मध्ये नागालँडमध्ये करण्यात आला होता. 

मग लोकसभेला काय करणार? मध्यप्रदेशमधील 230 मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राच्या मतमोजणीला 24 तासांचा वेळ लागला असेल तर लोकसभेला 543 मतदारसंघांमधील निकाल जाहीर करताना किती वेळ लागेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. यामुळे इव्हीएमवर एकीकडे संशय व्यक्त केला जाऊ लागल्यावर व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा निर्णय हा वेळखाऊ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसVVPATव्हीव्हीपीएटी