शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना मी का सांगू, ते काय लहान नाहीएत; शरद पवारांचे अदानी प्रश्नावर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:54 IST

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत, असे पवार म्हणाले.

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसे राज्याराज्यांत वेगवेगळी राजकीय समीकरणे उदयास येऊ लागली आहेत. आंध्रमध्ये भाजपाची साथ तेथील स्थानिक पक्षाने सोडली आहे. तर इंडिया आघाडीतही अनेक छोटे पक्ष इशारे देत आहेत. जागावाटपावर अद्याप बोलणी सुरु व्हायची आहेत, अशातच दिल्लीत आप आणि काँग्रेसमधला तिढा सुटेल असे वाटत नसताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर संकेत दिले आहेत. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पवार यांनी हा दावा केला आहे. दिल्लीत काँग्रेसकडे सध्या एकही खासदार नाहीय. अशा परिस्थितीत केजरीवाल काँग्रेसला आघाडीम्हणून सातपैकी तीन जागा सोडण्यास तयार असल्याचे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे केजरीवालांनीच हे आपल्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ईडीच्या कारवाईमुळे इंडियाची आघाडी आणखी मजबूत होईल असेही पवार म्हणाले. 

जर तुम्ही सत्तेत आलात आणि अदानींसोबत दिसलात तर राहुल गांधी टीका करतील, असे कसे चालेल या प्रश्नावर पवारांनी हसत हसत तुम्ही पहालच की कसे काम होईल ते, असे उत्तर दिले. 

तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत. ते एका पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचे विचार वेगळे असू शकतात, असे पवार म्हणाले. मी अदानींसोबत फित कापण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या अधिपत्याखाली मुंद्रा पोर्ट देशातील सर्वात मोठा पोर्ट बनला आहे. आपला देश तिथून आज बरेच काही आयात-निर्यात करतोय. मग त्यांच्यावर टीका का करावी? तुम्ही राहुल गांधींनाच हा प्रश्न विचारा असेही पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानी