शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री वर्मांना अटक का नाही?; सर्वोच्च न्यायालयाची बिहार पोलिसांना विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 04:49 IST

मुजफ्फरपूर येथील निवारागृहातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरून निवासस्थानाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार पोलिसांना विचारला.

नवी दिल्ली : मुजफ्फरपूर येथील निवारागृहातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरून निवासस्थानाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार पोलिसांना विचारला. हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वर्मा यांनी राजीनामा दिला होता.या शस्त्रास्त्रेप्रकरणी मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा हे सोमवारी बेगुसराई न्यायालयात शरण आले. न्यायमूर्ती एम. बी. लोकूर, एस. ए. नझीर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या लैंगिक शोषण आरोपातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याला बिहारच्या भागलपूर तुरुंगातून पंजाबमध्ये पटियालातील अति सुरक्षा तुरुंगात हलवण्यात यावे, असा आदेश दिला. ठाकूर अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असून, सध्या तो ज्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे तेथे त्याच्या ताब्यातून मोबाईल फोन जप्त करण्यात आला, असे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले होते. या निवारागृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार पहिल्यांदा टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायसेन्सच्या (टिस) आॅडिट रिपोर्टमध्ये उघडकीस आले होते. हा अहवाल राज्याच्या समाजकल्याण विभागाला सादर करण्यात आला होता.भयंकर आणि भीतिदायकया प्रकरणाच्या चौकशीतून जो तपशील सर्वोच्च न्यायालयासमोर आला तो वाचून ‘भयंकर’ आणि ‘भीतिदायक’ अशा शब्दांत त्याचे वर्णन करण्यात आले. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) ब्रजेश ठाकूरवरील आरोपांचा जो संदर्भ दिला त्याची नोंद घेऊन न्यायालयाने त्याला नोटीस देऊन तुम्हाला बिहारबाहेरच्या तुरुंगात का हलवण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBiharबिहारsexual harassmentलैंगिक छळ