शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 11:39 IST

राम मंदिर सोहळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा होणार असून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे. "जे रामाचे भक्त आहेत, केवळ त्यांनाच या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे," अशा शब्दांत आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.

"भाजपने आता फक्त भगवान राम यांना उमेदवार म्हणून घोषित करणं, हेच बाकी ठेवलं आहे," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावरूनही सत्येंद्र दास यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. "संजय राऊत यांना इतकं दु:ख होत आहे की ते सांगूही शकत नाहीत. ही लोकं रामाच्या नावावर निवडणुका लढवत होती. मात्र आता रामाला मानणारे लोक सत्तेत आहेत, त्यामुळे असं वक्तव्य करून राऊत रामाचा अपमान करत आहेत," असं ते म्हणाले.

राम मंदिर निमंत्रणाबद्दल काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण न मिळाल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. मी मुख्यमंत्री असताना, त्यापूर्वीही आयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन. अयोध्येमध्ये राममंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा संघर्ष केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी राममंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात आला होता. राममंदिरासाठी अनेक शिवसैनिक-कारसेवकांनी रक्त साडंलेलं आहे," असं ठाकरे यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा