शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपशासित राज्यांविरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 17:28 IST

नागालँड राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. 

भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांमधील सरकारांवर केंद्र सरकार कारवाई करत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले आहे. भाजपशासित राज्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. नागालँड राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. 

राज्यात महिला आरक्षण का लागू झाले नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. तुम्ही अन्य राज्य सरकारांविरोधात कठोर भूमिका घेता, मग जेथे तुमचा पक्ष सत्तेवर आहे त्या राज्यांविरोधात कठोर कारवाई का करत नाही, असा सवाल न्यायालयाने केला. 

समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचा समान सहभाग असताना महिलांच्या सहभागाला विरोध का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यावर नागालँडचे अॅटर्नी जनरल यांनी हे आरक्षण नको असे म्हणणाऱ्याच महिलांच्या संघटना आहेत. त्या मोठ्या प्रमाणावर असून त्या सुशिक्षित देखील आहेत, असे कारण सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

यावर न्यायमूर्ती कौल यांनी फटकारले. तुम्ही हे करू असे वचन दिले होते, पण तुम्ही मागे हटला आहात. बदलाला नेहमीच विरोध असतो. पण, स्थिती बदलण्याची जबाबदारी कोणीतरी घ्यावीच लागेल, असे म्हटले. यावर नागालँडच्या वकिलांनी राज्य सरकार काही गोष्टी करत आहे. इशान्येकडील राज्यांची परिस्थिती पाहता याला थोडा वेळ द्यावा, असे न्यायालयाला उत्तर दिले. केंद्र सरकार या मुद्द्यावरून हात मागे घेऊ शकत नाही. राज्यातील राजकीय व्यवस्था केंद्रातील राजकीय व्यवस्थेशी सुसंगत आहेत. पुढच्या वेळी तुम्ही तोडगा न दिल्यास आम्ही या प्रकरणाची सुनावणी करून अंतिम निर्णय घेऊ, असा सज्जड दम सर्वोच्च न्यायालयाने भरला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा