शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

आज भारत बंद कशासाठी? कोणत्या संघटना यात सामील? काय आहेत मागण्या? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:59 IST

आज विविध संघटनांनी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे.

Bharat Bandh : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी(दि.21) 14 तासांसाठी भारत बंद पुकारण्यात आला आहे. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन (NACDAOR) नावाच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात असल्याचे म्हटले असून, तो रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयाविरोधात भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणे, तो मागे घेण्याची मागणी करणे आणि सरकारवर दबाव आणणे, हा आजच्या भारत बंदचा मुख्य उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणातील कोट्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा किंवा फेरविचार करावा, असे संघटनांचे म्हणणे आहे. बंदमध्ये सहभागी असलेल्या NACDAOR ने बुधवारी शांततापूर्ण आंदोलनात दलित, आदिवासी आणि ओबीसींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

काय आहेत संघटनांच्या मागण्या ?NACDAOR संघटनेने सरकारी नोकऱ्या करणाऱ्या सर्व SC, ST आणि OBC कर्मचाऱ्यांची जातीची आकडेवारी जाहीर करावी आणि भारतीय न्यायिक सेवेद्वारे न्यायिक अधिकारी आणि न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. यासह, संघटनेचे म्हणणे आहे की, सरकारी सेवेतील एससी/एसटी/ओबीसी कर्मचाऱ्यांचा जाती आधारित डेटा ताबडतोब जाहीर केला जावा, जेणेकरून त्यांचे अचूक प्रतिनिधित्व सुनिश्चित करता येईल. उच्च न्यायव्यवस्थेत SC, ST आणि OBC प्रवर्गातील 50 टक्के प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील न्यायिक अधिकारी आणि न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी भारतीय न्यायिक सेवा आयोगाची स्थापना केली जावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

भारत बंदमध्ये कोणत्या संघटना आणि पक्ष सहभागी आहेतदलित आणि आदिवासी संघटनांशिवाय अनेक राज्यांतील प्रादेशिक राजकीय पक्षही आजच्या भारत बंदला पाठिंबा देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी (काशीराम), भारत आदिवासी पार्टी, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, एलजेपी (आर) आणि इतर संघटनांचा समावेश आहे. काँग्रेसनेही बंदला पाठिंबा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाला विरोध ?सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच आरक्षणातील क्रिमी लेयर आणि कोट्याशी संबंधित खटल्यात आपला निकाल दिला होता, ज्यामध्ये कोट्यामध्ये कोटा निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना आहे, असा निर्णय घटनापीठाने 6-1 अशा बहुमताने पास केला. या निर्णयानंतर राज्य सरकारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उप-श्रेणी तयार करू शकतात, जेणेकरून सर्वात गरजूंना आरक्षणात प्राधान्य मिळू शकेल.

सर्वोच्च न्यायालयाने 2004 चा स्वतःचाच जुना निर्णय रद्द केला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की, SC मध्ये कोणत्याही एका जातीला 100% कोटा दिला जाऊ शकत नाही आणि SC मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जातीचा कोटा ठरवण्यापूर्वी त्याच्या वाट्याबद्दल ठोस डेटा असणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा मोठा निर्णय दिला आहे.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदSupreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण