शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 11:10 IST

एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली.

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं, ज्याने सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश केला. एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली. महिलेचा नवरा आणि तिचा मुलगा तिला टोपलीत बसवून खांद्यावरून घेऊन आले होते. यामागचं कारण हैराण करणारं आहे. गावात रस्ता तयार झाला नसल्याने त्रस्त झालेल्या कुटुंबाने वृद्ध महिलेला टोपलीतून आणण्यात आले. 

झारखंडमधील या घटनेने सरकारच्या विकास योजनांचा पर्दाफाश झाला आहे. एकीकडे झारखंड सरकार गावागावात पक्के रस्ते बनवण्याचा दावा करत आहे. पण दुसरीकडे लातेहार जिल्ह्यातील महुआदंड ब्लॉकमध्ये अजूनही अशी अनेक गावे आहेत, जिथे पक्के रस्ते नाहीत. तसेच कच्चा रस्ताही तिथे बांधला गेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालखंड हे असेच एक गाव आहे. या गावात आजपर्यंत रस्त्याचे बांधकाम न झाल्यामुळे आजही ग्रामस्थांना पायीच गावात ये-जा करावी लागत आहे. विकासाच्या नावाखाली धावणारी वाहने आजही या गावापासून दूर आहेत. मुख्यालयापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात सायकलनेही पोहोचणे कठीण आहे. या कारणामुळे वृद्ध महिलेला टोपलीत आणावे लागले. 

चालता येत नसल्याने लालो कोरबा या महिलेला तिचे पती देवा कोरबा आणि मुलगा सुंदरलाल कोरबा यांनी पेन्शनचे पैसे काढण्यासाठी एका टोपलीतून महुआदंड येथे आणले. मात्र, बँकेमध्ये लिंक फेल झाल्याने महिलेला पेन्शनही मिळू शकले नाही. त्यामुळे तिला विनाकारण घरी परतावे लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Jharkhandझारखंड