शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या गुजरात निवडणुकीत कुठलाही पक्ष मुस्लिमांच्या मुद्यावर का नाही बोलत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:31 IST

नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून   2012 पर्यंत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी होता.

ठळक मुद्देयंदाच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाने थेट मुस्लिमांच्या मुद्याला हात घातलेला नाही.182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 20 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे.

अहमदाबाद - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीतून मुस्लिमांचा मुद्दा जणू गायब झाला आहे. नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून   2012 पर्यंत तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिमांचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. मुस्लिमांवरील अन्याय, पक्षपाती वागणुकीला मुद्दा बनवून विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना टार्गेट करायचे. 

पण यंदाच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाने थेट मुस्लिमांच्या मुद्याला हात घातलेला नाही. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 20 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. या 20 मतदारसंघांमध्ये उमदेवाराच्या जय-पराजयामध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरते. मुस्लिमबहुल वीस मतदारसंघांमध्ये अहमदाबाद जिल्ह्यात चार, भरुच आणि कच्छमध्ये प्रत्येकी तीन मतदारसंघ आहेत. 

आतापर्यंत गुजरातमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार आणि जी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरु आहे त्यामध्ये जातीय राजकारणाचा प्रभाव जास्त दिसतोय. पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलिता नेता जिग्नेश मेवानी यांच्याभोवती राजकारण फिरत आहे. मुस्लिमांऐवजी आरक्षण मुख्य मुद्दा बनला आहे.  

- 2002 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गुजरात दंगलीला मुख्य मुद्दा बनवले होते. त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या दंगलीला कसे जबाबदार होते. त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमधल्या मुस्लिमांवर अन्याय झाला. एकूणच मोदी आणि भाजपा मुस्लिमविरोधी असल्याच्या अंगाने काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता.     

- त्यानंतर पाचवर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही 2007 साली काँग्रेसने गुजरात दंगलीच्या मुद्दा सोडला नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी मोदींना 'मौत का सौदागर' म्हटले होते. त्याचा उलटा फायदा भाजपाला झाला. 

- 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. पण परिस्थिती पहिल्या दोन निवडणुकांसारखी नव्हती. काँग्रेसला त्याचा फारसा फायदा झाला नाही आणि तिस-यांदा मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आले.                                                                                                                                                                   - 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मुस्लिमांच्या सुरक्षिततेच्या मुद्याला प्राधान्य दिले. नरेंद्र मोदींचे नाव न घेता सोनिया गांधी गुजरातमध्ये 'जेहेर की खेती' होते असे म्हणाल्या. त्यावेळी सुद्धा भाजपालाच फायदा झाला. भाजपाने इथे लोकसभेच्या सर्वच्या सर्व 26 जागा जिंकल्या. 

यावेळी काँग्रेसने आपल्या प्रचाराच्या रणनितीमध्ये मोठा बदल केला आहे. राहुल गांधी अधिक सावध आणि सतर्क आहेत. राहुल गांधींनी मोठया प्रमाणावर गुजरातमधल्या मंदिरांना भेटी दिल्या आहेत. काँग्रेसने मुस्लिमांच्या विषयावर थेट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे गुजरातमध्ये यंदाच्या निवडणुकीत मुस्लिमांचा मुद्दा गायब झाल्याचे चित्र आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदी