शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप डाउनलोडसाठी का हवी फोन, ईमेल लिस्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:23 IST

डेटा लीक, डाटाची सुरक्षितता व खासगीपणावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) मोठे पाऊल उचलले आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : डेटा लीक, डाटाची सुरक्षितता व खासगीपणावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) मोठे पाऊल उचलले आहे. ट्रायने अ‍ॅप डाऊनलोडसाठी आवश्यक रूपात मिळवण्यात येणाऱ्या संमतीसाठी नियम बनवण्याचे ठरवले आहे.जेव्हा कोणी अ‍ॅप डाऊनलोड करतो तेव्हा त्याच्याकडे सगळ््या डेटापर्यंत प्रवेश मागितला जातो, हे चुकीचे असून त्याबाबत लवकरच कन्सल्टेशन पेपर (सल्ला पत्र) आणले जाईल, असे ट्रायचे म्हणणे आहे. या विषयावर सर्व संबंधितांकडून मते मागवून त्यानंतर नियम बनवले जातील.ट्रायकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या की जेव्हा आम्ही अ‍ॅप लाऊनलोड करतो तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टबरोबर आपली फोटो गॅलरी, तुमचे एसएमएस व आपल्या ईमेलसह इतरही डाटापर्यंत देण्यास सांगितले जाते. त्याला नकार दिला तर अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. आम्हाला अ‍ॅपची गरज आहे परंतु आम्हाला अ‍ॅपला आमच्या डेटापर्यंत जाऊ देण्याची इच्छा नाही. हे खासगीपणाचे उल्लंघन आहे. यामुळे ट्रायने याबाबत नियम बनवायला हवेत. अ‍ॅपला सर्व डेटापर्यंत का प्रवेश हवा आहे?या लोकांचे हे म्हणणे आहे की, जर आम्ही अ‍ॅपचा वापर करू इच्छितो तर त्या अ‍ॅपवर आम्ही करीत असलेल्या संवादापर्यंतही अ‍ॅपने पोहोचता कामा नये. जर कधी सुरक्षा एजन्सीला गरज भासली तर त्यांनी त्यांच्या सर्व्हरवरून डेटा संबंधित एजन्सीला उपलब्ध करून द्यावा. परंतु तो वाचू नये.एका अधिकाºयाने सांगितले की, लोकांची ही तक्रार नैतिकतेच्या मुद्द्यावर चुकीची नाही. कोणत्याही अ‍ॅपला समस्त फोटो, ईमेल, एसएमएस वा कॉन्टॅक्ट लिस्ट कशासाठी हवी आहे? आम्ही हा प्रश्न लोकांसमोर ठेवू. त्याचसोबत तांत्रिक कंपन्या आणि इतर भागधारक किंवा उद्योगाशी संबंधित लोकांशी चर्चा करू. लवकरच सल्लापत्र प्रसिद्ध केले जाईल. याशिवाय अ‍ॅपवर या प्रकारची सहमतीबद्दल एक मार्गदर्शन करण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत ट्रायलची लवकरच बैठक होणार आहे व त्यानंत पुढील उपाययोजना होईल, असे अधिकारी म्हणाला.