शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

"मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे का विकली?"; रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कोर्टाने रेल्वेला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:28 IST

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते. या प्रकरणावरुन दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात याचिकाकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची चौकशी करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्ही गरजेपेक्षा जास्त तिकिटे का विकलीत? असा सवाल रेल्वे प्रशासनाला केला आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. भविष्यात रेल्वे स्थानकांवर चेंगराचेंगरी होऊ नयेत यासाठी सुरक्षा उपाय करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली. सुनावणीदरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी रेल्वेला खडसावले. सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने खंडपीठाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये या मुद्द्यांवर कोणती पावले उचलली याचा तपशील देण्यास सांगितले आहे. 

तसेच डब्यातील प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विकण्याची गरज काय असा सवाल न्यायालयाने केला. या घटनेवर दाखल केलेल्या याचिकेवरुन उच्च न्यायालयाने रेल्वेला चौकशी करण्याचे आदेश दिले. डब्यातील प्रवाशांची संख्या ठरवलेली असते तर जास्त तिकीटे का विकता? विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या मर्यादित प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त का आहे? ही एक समस्या आहे, असं न्यायालयाने म्हटलं.

याचिकाकर्त्याच्या सांगितले की, "घटनेच्या दिवशी ९६०० पेक्षा जास्त अनारक्षित तिकिटे विकली गेली. जर रेल्वेने आपले नियम आणि तरतुदी पाळल्या असत्या तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. ही याचिका राष्ट्रीय हित आणि व्यापक जनहितासाठी आहे. मी पायाभूत सुविधा किंवा धोरणात्मक मुद्द्यांवर भाष्य करत नाही.”

यावर न्यायमूर्ती गेडेला म्हणाले की "त्या दिवशी स्टेशनवर किती लाख लोक होते हे तुम्हाला माहीत आहे का? अशा प्रकारच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने शक्य झाले नसते. नंतर उपाययोजना करण्यात आल्या."

दरम्यान, रेल्वे कायद्याच्या कलम ५७ चा हवाला देत उच्च न्यायालयाने रेल्वेला जास्तीत जास्त प्रवाशांची संख्या निश्चित करण्याचे आणि प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तपासण्याचे आदेश दिले. दुसरीकडे,  सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रेल्वे कायद्याचे पालन करण्यास बांधील असल्याचे सांगितले. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हणत याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा सर्वोच्च पातळीवर विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.

टॅग्स :New Delhi Railway Station Stampedeनवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरीHigh Courtउच्च न्यायालयcentral railwayमध्य रेल्वे