शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना का सोडावे लागले मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या,  पंजाबमधील राजीनामानाट्यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:08 IST

अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला? स्वाभिमान दुखावला? पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट...

पवन देशपांडे -

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणजे राजेशाही थाट... हवेलीस्टाईल बाज आणि ठाकूरस्टाईल वागणूक... तुम्ही असाल कोणीही... मी मुख्यमंत्री आहे... हा रुबाब... असा त्यांचा वावरच त्यांच्या राजीनाम्यामागील एक कारण बनले... अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्यामुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला... हा या पंजाबी सिनेमाचा क्लायमॅक्स असला तरी त्याची स्क्रिप्ट तशी लिहिल्या जाण्यालाही खुद्द कॅप्टनच जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला?- निवडीवरून मदभेद, कोणाचं डिमोशन करायचं, कोणाला वरती आणायचं... असा जो काही खेळ सध्या क्रिकेट टीम इंडियामध्ये सुरू आहे, तोच खेळ पंजाबमध्ये पाहायला मिळाला. या खेळात कॅप्टन विराट कोहलीचीच विकेट गेली आणि त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. (किंवा सोडावे लागले.) - हाच संपूर्ण डाव पंजाब काँग्रेसमध्येही गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. विराट कोहली ज्या भूमिकेत त्याच कॅप्टन अमरिंदर सिंगही होते. अंतर्गत कलह आणि राजकीय डावपेचांमध्ये सिद्धू कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर भारी पडले. - या सामन्यात सिद्धू यांनी विजय मिळवल्याचे दिसत असले तरी चक्र काय फिरतील, हे काळच ठरवेल.

स्वाभिमान दुखावला? दोन महिन्यांत तीन वेळा आमदारांची बैठक बोलवण्यात आली आणि आपण सरकार चालवण्यास सक्षम नसल्याचा संशय घेतला गेला, असं मत कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलं. त्यातून हेच दिसून आले की गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील घडामोडींमुळे कॅप्टन दुखावले गेले. त्याचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी पद सोडले. जाता जाता त्यांनी राजकीय 'पर्याय' उपलब्ध असल्याचे स्पष्ट करून नवी मेख मारली आहे. 

पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट -- पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणे त्यांनी कायम टाळले, असा त्यांच्यावर आरोप आहे. - ते विरोधकांशी मिळालेले आहेत, अशी शंकाही कायम घेतली गेली. - कॅप्टन बहुतेक वेळा महाराजा स्टाइलने काम करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संपर्क करणेही अवघड झाले होते. - आमदारांचं म्हणणे ऐकण्याऐवजी त्यांनी अनेकदा सल्लागारांचे ऐकले, हाही आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू यांची एंट्री. त्यांनी कॅप्टन सिंग यांचा पूर्णच गेम पलटवला. 

सिद्धूंची एंट्री आणि पंजाब काँग्रेसमध्ये झाले मोठे बदल... -नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पंजाब काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू झाली आहे. सिद्धू सेलिब्रिटी आहेत, त्यांचा पक्षाला फायदा होईल असे तेथील आमदारांनाही वाटू लागले आहे. सिद्धू यांना अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेटमंत्रीपद दिले होते, पण त्यावर ते खुश नव्हते. 

त्यांनी विरोधाची धार तीव्र केल्यानंतर अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असेलेल पक्षातीलच नेते आणि आमदार सिद्धू यांच्या टीममध्ये दाखल झाले. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधाला हवा देण्यास सुरूवात केली. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अमरिंदर सिंग नाराज होते. त्यानंतर या दोघांमधील महत्त्वाकांक्षेचे युद्ध टोकाला पोहोचले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्री