शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तरीही चीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक का करतोय? राहुल गांधी यांनी उपस्थित केली अतिगंभीर शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:27 IST

गलवान खोऱ्यात झालेल्या चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेले राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले असून, त्यांच्याबाबत अतिगंभीर शंका उपस्थित केली आहे.

ठळक मुद्देचीन आमच्या जवानांची हत्या करत आहे.चिनी सैनिक आमची जमीन बळकावत आहेत तरीही चीनमधील प्रसारमाध्यमे आमच्या पंतप्रधानांचे कौतुक का करत आहेत

नवी दिल्ली -  लडाखमधील गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोपप्रत्यारोपांचे सत्र अतिगंभीर रूप घेण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेले राहुल गांधी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले असून, त्यांच्याबाबत अतिगंभीर शंका उपस्थित केली आहे. चीन आमच्या जवानांची हत्या करत आहे. त्यांचे सैनिक आमची जमीन बळकावत आहेत आणि तरीही चीनमधील प्रसारमाध्यमे आमच्या पंतप्रधानांचे कौतुक का करत आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

गलवानमधील घुसखोरीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज सकाळपासूनच घेरले असून, सकाळी माजी पंतप्रधान महमोहन सिंग यांनी मोदींना खडेबोल सुनावल्यानंतर आता संध्याकाळी राहुल गांधी यांनी एका वृत्ताचे कात्रण शेअर करून मोदींबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या विधानावरून चिनी प्रसारमाध्यमांनी तणावपूर्ण परिस्थितीतही त्यांचे कौतुक केले होते. त्यावरूनच राहुल गांधी आता आक्रमक झाले आहेत. 

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सकाळी मोदींना उपदेशाचे डोस पाजले होते. शब्दांची निवड करताना काळजी घेण्याचा सल्ला सिंग यांनी दिला होता. तसेच आपल्या वक्तव्यांमधून चीनच्या कटकारस्थांनाना बळ मिळता कामा नये असे सांगितले होते, आता राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांचे ते विधान ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी मनमोहन सिंग यांचा सल्ला विनम्रतेने ऐकतील, असे म्हटले होते.  

पंतप्रधानांनी आपले शब्द, घोषणा करताना देशाची सुरक्षा, सामरिक आणि भूभागीय हितसंबंधांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन