शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"अनेक राज्ये तोट्यात तरीही का वाटली जातेय मोफत खैरात..."; सरन्यायाधीश संतापले, कोर्टात काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:56 IST

आम्ही फक्त तामिळनाडू पुरतं बोलत नाही. निवडणुकीपूर्वीच अशा घोषणा का केल्या जातात हा आमचा प्रश्न आहे असं सरन्यायाधीश यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - मोफत खैरात वाटपावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. मोफत योजनांमुळे अनेक राज्यातील सरकारवर कर्जाचा बोझा वाढला असून उत्पन्नही घटले आहे यावरून सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्ज वाढत असतानाही मोफत योजना वाटल्या जात आहेत. याऐवजी रोजगार निर्मितीवर जास्त भर देणे आवश्यक आहे असं कोर्टाने म्हटलं. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठाने ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर तामिळनाडू येथील वीज कंपनीशी निगडित एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. आम्ही टॅरिफ दर आधीच निश्चित केले होते असं वीज कंपनीचे म्हणणं होते तर आम्ही वीज मोफत केल्याचं सरकारने म्हटलं. यावरून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. जर सरकार मोफत पैसे, वीज अथवा इतर सुविधा देत राहील तर त्याचा खर्च कोण उचलणार? अखेर मोफत खैरात वाटपाचा भार करदात्या लोकांवरच पडणार आहे. सरकारने मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीकडे जास्त लक्ष द्यायला हवे असं सरन्यायाधीशांनी सांगितले. 

त्याशिवाय अशाप्रकारे मोफत गोष्टी देत राहिल्या तर देशाचा आर्थिक विकास थांबेल. काही लोकांना शिक्षण अथवा मुलभूत आयुष्य जगणेही कठीण असते. त्या लोकांना सुविधा देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. परंतु मोफत खैरात अशा लोकांच्या खिशात जातेय जे आधीच मजा करत आहेत. या अशा गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यायला हवे ना? आम्हाला अशा राज्यांची माहिती आहे जिथे मोफत वीज दिली जाते. भलेही तुम्ही मोठे जमीनदार का असेना..तुम्हाला एखादी सुविधा हवी असेल तर त्यासाठी पे करायला हवे. हा करदात्यांचा पैसा आहे असं सरन्यायाधीशांनी खडसावले.

दरम्यान, आम्ही फक्त तामिळनाडू पुरतं बोलत नाही. निवडणुकीपूर्वीच अशा घोषणा का केल्या जातात हा आमचा प्रश्न आहे. यावर सर्व राजकीय पक्ष, समाजसेवक आणि विचारवंतांनी विचार करण्याची गरज आहे. हे कधीपर्यंत सुरू राहील. राज्य तोट्यात जात आहे तरीही मोफत खैरात दिली जाते. जर तुम्ही एका वर्षांत २५ टक्के महसूल जमा करता, तर त्याचा वापर राज्यातील विकासासाठी का केला जाऊ शकत नाही असा सवालही सरन्यायाधीशांनी सुनावणी वेळी विचारला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Justice criticizes freebies amidst state losses; court questions policy.

Web Summary : Supreme Court slams freebies, citing states' debt and reduced income. The Chief Justice questioned who bears the cost of free schemes, emphasizing job creation. Court highlighted financial strain and urged focus on development, not unsustainable handouts, demanding responsible resource allocation.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय