‘जे प्रशंसनीय आपण त्यालाच भगवेकरण म्हणतो’
By Admin | Updated: June 9, 2015 00:56 IST2015-06-09T00:56:47+5:302015-06-09T00:56:47+5:30
शिक्षणाचे ‘भगवेकरण’ सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हल्ला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी परतवून लावला.

‘जे प्रशंसनीय आपण त्यालाच भगवेकरण म्हणतो’
नवी दिल्ली : शिक्षणाचे ‘भगवेकरण’ सुरू असल्याचा आरोप करणाऱ्यांचा हल्ला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी परतवून लावला. विदेशात भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीची प्रशंसा होते. मात्र देशात याच प्राचीन शिक्षण पद्धतीला ‘भगवेकरणाचे’ नाव देऊन तिच्यावर टीका केली जाते, असे इराणी म्हणाल्या.
हिंदू शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रिंस्टन विद्यापीठाचे प्रोफेसर मंजूळ भार्गव यांना आपल्या देशात टीकेचे धनी व्हावे लागत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संस्कृतच्या कवितांच्या माध्यमातून गणिताचे सिद्धांत शिकवल्याचे भार्गव यांनी मान्य केले. त्यामुळे ते गणिताचे भगवेकरण करीत असल्याचा आरोप होत आहे, असे त्या म्हणाल्या.
(लोकमत न्यूज नेटवर्क)