शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, निर्णय आता सोमवारी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:24 IST

शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केला. 

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाच्या लढाईत पहिली सुनावणी आज चार वाजता केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून एकही नेता निवडणूक आयोगात उपस्थित नव्हता. शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी जोरदार युक्तिवाद केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने सर्वात आधी जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. तसेच, सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरा पक्ष आहोत. शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. याशिवाय, अजित पवार गटाने आमदारांच्या संख्येचा दाखला देताना नागालँडमधील आमदारांची संख्याही दाखवली. आमच्याकडे 55 आमदार आणि 2 खासदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला.  

दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आगोयामध्ये सुनावणी सुरू असून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्हं आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने  निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही. 588 जणांच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड ही शरद पवारांनीच केली होती. राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, असे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह 9 जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता याबाबतची निवडणूक आयोगातील पहिल्या दिवसाची सुनावणी अखेर संपली आहे. आता पुढची सुनावणी सोमवारी 9 ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती वकील मानिंदर सिंह यांनी दिली आहे.

सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे.... 

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाला याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी झाली- स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल- शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित - अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही - पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा - अजित पवार गट- जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा - पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद- 55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा- महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे - अजित पवार गट 

- शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. - राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, शरद पवार गटाकडून युक्तिवाद- मुख्य प्रतोद आमच्या बाजूने, त्यामुळे  9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर - अजित पवार गट - शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर- अजित पवार गटाचा मोठा दावा - 10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये बैठक. पण त्याच्या आधी 1 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ते आधीच जाहीर झालं होतं, केवळ औपचारिकता म्हणून 10 सप्टेंबरची निवड झाली का? - अजित पवार गट - अजित पवार गटानं पक्षाची भूमिका पाळली नाही - शरद पवार गट- राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा? सर्वांना माहिती - शरद पवार गट- पक्षाच्या विरोधात अजित पवार गटाची भूमिका - शरद पवार गट- अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही - शरद पवार गट- एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे - शरद पवार गट- २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा - शरद पवार गट- पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली - शरद पवार गट- शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार गट- शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाही - शरद पवार गट- शरद पवारांचं नेतृत्व मान्य असं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे - शरद पवार गट- निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा - शरद पवार गट

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस