शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधी कोणाच्या कुंडलीत? स्वच्छतेचा ठेका : कामगारांना रक्कम मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम, गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गासाठी स्वच्छतेचा ठेका देत महापालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांचे वेतन अदा केले जात असतानाच त्यांच्या निश्चित केलेल्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा निधीची प्रतिदिन प्रतिकामगार सुमारे ९३ रुपयांची रक्कमही दैनंदिन कपात केली जात आहे. मात्र, ठेक्याची मुदत संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची एकत्रित रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित कामगारांना महापालिकेचे उंबरे झिजवावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनेकांना रक्कम प्रत्यक्ष हातात पडेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. ठेका संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम कोणाच्या कुंडलीत आहे, असा गमतीशीर सवालही उपस्थित होत आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम, गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गासाठी स्वच्छतेचा ठेका देत महापालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांचे वेतन अदा केले जात असतानाच त्यांच्या निश्चित केलेल्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा निधीची प्रतिदिन प्रतिकामगार सुमारे ९३ रुपयांची रक्कमही दैनंदिन कपात केली जात आहे. मात्र, ठेक्याची मुदत संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची एकत्रित रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित कामगारांना महापालिकेचे उंबरे झिजवावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनेकांना रक्कम प्रत्यक्ष हातात पडेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. ठेका संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम कोणाच्या कुंडलीत आहे, असा गमतीशीर सवालही उपस्थित होत आहे.
महापालिकेने गोदाघाट, भाविक मार्ग याठिकाणी पाच ठेकेदारांना स्वच्छतेचा ठेका दिला आहे, तर साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद न्यायप्रवीष्ट असल्याने गोदाघाट व भाविकमार्गासाठी असलेल्या ठेकेदारांकडूनच अतिरिक्त मनुष्यबळ घेत स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. महापालिकेने सुमारे ३३०० सफाई कामगार नेमले असल्याचे सांगितले जाते. या कामगारांना किमान वेतन २९३.८४ रुपये असून त्यात एचआरए समाविष्ट केल्यास ३०८.५३ रुपये जमा होणे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर ठेकेदाराकडून भविष्य निर्वाह निधी ३५.२६ रुपये, ईएसआय ५.३८ रुपये जमा होणे गरजेचे आहे, तर महापालिका दोन्ही मिळून आपला हिस्सा कामगाराच्या खात्यात ५३ रुपये जमा करत असते. भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयची रक्कम कपात होऊन कामगाराच्या हातात प्रत्येकी २६७.८८ रुपये पडणे आवश्यकच आहे. मात्र, कामगारांना प्रत्यक्षात हाती पडणार्‍या रकमेत तफावत असून, अनेक कामगारांकडून वेगवेगळ्या रकमेचे आकडे सांगितले जात आहेत. वेतनाच्या या गफलतीबद्दल स्थायी समितीनेही प्रत्यक्ष कामगारांच्या भेटी घेऊन पोलखोल केली होती. आता कामगारांच्या खात्यात जमा होणार्‍या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. सदर रक्कम जमा होत असेलही; परंतु प्रत्यक्षात कामाची मुदत संपल्यानंतर कामगारांच्या हातात ती पडेल की नाही, याबाबत शंका उत्पन्न झाल्या आहेत. अनेक कामगार हे परप्रांतीय असून बव्हंशी कामगारांना तर बॅँक खात्याचे पुरेसे ज्ञानही नाही. त्यामुळे एटीएमचा वापर करणे तर दूरच कामाची मुदत संपून गेल्यानंतर संबंधित कामगार हे आपल्या गावी निघून जातील. त्यामुळे संबंधित कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कशी अदा केली जाणार, त्याबाबत कामगारांनाही काहीही माहिती देण्यात आलेली नाही. असंख्य कामगारांना तर असा काही निधी आपल्या भविष्यात लिहून ठेवला आहे, याची सुतराम कल्पनाही नाही. त्यामुळे हा निधी नेमका कुणाच्या कुंडलीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इन्फो
कसा मिळणार निधी?
सदर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कशी अदा केली जाणार, याविषयी एका वरिष्ठ अधिकार्‍याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी धक्काच दिला. कामाची मुदत संपल्यानंतर संबंधित कामगाराला व्यक्तिगतरीत्या महापालिकेकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याची फाईल प्रशासकीय पातळीवर फिरेल. नंतर ती मान्यतेनंतर भविष्य निर्वाह निधीकडे जाईल. त्यानंतरच निधी कामगाराच्या हाती पडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. बव्हंशी कामगार हे अशिक्षित आणि परप्रांतीय असल्याने त्यांना या प्रक्रियेतून जाण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे. हातावर पोट भरणार्‍या या कामगारांकडून त्यामुळे सदर पैशांवर पाणी सोडण्याचीच शक्यता बोलून दाखविली जात आहे. परिणामी, सदर निधी नेमका कोणाच्या घशात जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.