शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निकालांवर सट्टाबाजार तेजीत; पंतप्रधानपदासाठी कोणाला दिली पसंती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 11:47 IST

गुजरातमधील एका अंदाजावरुन लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे.

अहमदाबाद - देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष्य निवडणुकींच्या निकालाकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालांवरुन सट्टाबाजारही तेजीत आलेला आहे. गुजरातच्या पाच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. ऊंझा, मेहसाणा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सट्टा खेळला जातो. 

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर सट्टाबाजारात निवडणुकीच्या निकालांबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुजरातमध्ये सट्टाबाजारात निकालांच्या जागेवरुन वेगवेगळे दर लावले आहेत. 21 जागांसाठी 27 पैसे, 22 जागांसाठी 60 पैसे तर 23 जागांसाठी 1 पैसे असे दर ठरलेले आहेत. तसेच 24 जागांसाठी एक रुपया 80 पैशाच्या बदल्यात 2 रुपये 20 पैसे दर सुरु आहे. गुजरातमधील 26 जागांसाठी 7 पैशाच्या बदल्यात 8 रुपये 50 दर लावण्यात आला आहे. 

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन सट्टाबाजारात नरेंद्र मोदी यांच्यावर 14 पैसे दर लावण्यात आला आहे तर राहुल गांधी पंतप्रधान बनतील यावर 5 रुपये दर सुरु आहे. सट्टाबाजारात ज्यांचे दर कमी त्यांची जिंकण्याची संधी जास्त असते असं मानलं जातं. 

गुजरातमधील एका अंदाजावरुन लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे. दरम्यान 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे कमी आहे. गुजरातमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर 500 कोटी रुपये सट्टा लागला होता अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर बुकीने दिली.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्व सामान्यांप्रमाणेच सट्टाबाजाराचेही लक्ष्य लागून राहिले आहे. 

सध्या सट्टाबाजारात भाजपाला पसंती मिळताना पाहायला मिळत आहे मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांची कामगिरी घसरण्याचा दावाही केला जात आहे. भाजपानेतृत्वातील एनडीएला सरकार बनविण्यासाठी बहुमत मिळणं कठीण आहे तर काँग्रेस आणि युपीएची स्थितीत जास्त सुधारणा नाही. सट्टाबाजारात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पार्टी, आरएलडी आघाडी, डीएमके, तृणमूल काँग्रेस, वाईएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीची कामगिरी सुधारेल. सट्टाबाजारात उत्तर प्रदेशात भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच बंगालमध्ये भाजपाला ताकद मिळेल असंही सांगितलं आहे सोबत ओडिशामध्येही भाजपाला चांगले यश मिळेल. मात्र बहुमताला घेऊन एनडीएमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी