शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या नागरिकत्वावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह, प्रियंका गांधी म्हणाल्या बकवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 15:33 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते.  कुठले राहुल गांधी खरे आहेत, लंडनमधले की लुटियन्समधले? सवाल भाजपाने उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्त देताना भाजपाने केलेले आरोप म्हणजे निव्वळ बकवास आहे, असा टोला लगावला आहे. नागरिकत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर आरोपांच्या फैरी झाडल्या.  2003 मध्ये बॅकअप्स नावाच्या कंपनीची इंग्लंडमध्ये नोंदणी करण्यात आली होती. राहुल गांधी हे या कंपनीचे संचालक आणि सचिव होते. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी स्वत: ब्रिटिश नागरिक असल्याचे म्हटले होते. या कागदपत्रांच्या आधारावरच गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच ही कागदपत्रे स्वत: राहुल गांधी यांना सत्यापित केली आहेत, असा दावाही पात्रा यांनी केला. मात्र प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. ''हे आरोप निखालस खोटे आहेत. राहुल गांधी याचा जन्म भारतातच झाला. तसेच त्यांचे संगोपनही येथेच झाले. राहुल गांधी हे भारतीच आहेत हे संपूर्ण देश जाणतो, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.  याआधी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला होता. याच बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक