शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:41 IST

आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली/ अमरावती  - आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.नायडू यांनी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या खासदारांशी शुक्रवारी संवाद साधला. ते म्हणाले की, संसदेत कामकाज वारंवार तहकूब करून, भाजपा व मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या प्रश्नापासून पळ काढला. भाजपा या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करीत आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आणि राज्यसभेत सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढावे लागणार आहे.तेलगू देसमच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गुरुवारी निदर्शने केली, त्या वेळी वायएसआर काँग्रेसचे खासदार त्यात सहभागी झाले नाहीत. पूर्वी ब्रिटिशांबरोबर काही एतद्देशीय लोक हातमिळवणी करायचे, तसेच सध्या भाजपा व वायएसआर काँग्रेसचे नाते आहे, असा आरोप त्यांनी केला.आंध्रला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी तेलगू देसमच्या नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राजधानी अमरावतीमध्ये सायकल मोर्चा काढला. या सहा किलोमीटरच्या सायकल मोर्चात स्वत: नायडू हेही सायकल चालविताना दिसत होते.काँग्रेसचा हक्कभंग ठरावसोनिया व राहुल गांधी यांच्यामुळे लोकसभेत वारंवार गदारोळ होत असून त्यामुळे लोकसभेचे कामकाज पार पाडणे अशक्य झाले आहे असे विधान करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हक्कभंग ठराव आणला आहे. बँकिंग घोटाळा तसेच अविश्वास ठराव अशा अनेक मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची इच्छा होती. पण केंद्र सरकारलाच ते नको आहे, असे ते म्हणाले.वायएसआर काँग्रेसच्या खासदारांचेही राजीनामाआंध्र प्रदेशला केंद्राने विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील पाच सदस्यांनी शुक्रवारी आपले राजीनामे लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केले. त्या पक्षाचे आता राज्यसभेत विजयसाई रेड्डी हे एकमेव खासदार आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण