शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:42 IST

दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे म्हटलं.

PM Modi on Delhi Blast: सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सध्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाषण देताना त्यांनी दिल्ली स्फोटातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले.

भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी आज जड अंतःकरणाने येथे आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांना खूप दुःख झाले आहे. मी पीडित कुटुंबाचे मला दुःख मला समजत आहे. संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व तपास यंत्रणांशी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व प्रमुख लोकांशी मी काल रात्रभर संपर्कात होतो. चर्चा सुरू होती आणि माहिती एकत्र केली जात होती. आमच्या तपास यंत्रणा या कटाच्या तळाशी जातील. यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही."

दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, तपास संस्था या घटनेची जलद आणि सखोल चौकशी करत आहेत आणि लवकरच अहवाल सार्वजनिक केला जाईल. "मी देशवासीयांना खात्री देऊ इच्छितो की देशातील प्रमुख संस्था या अपघाताची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. तपासाचे निकाल लवकरच समोर येतील आणि या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही," असे राजनाथ सिंह म्हणाले.

दिल्लीत सोमवारी संध्याकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हुंडई आय-२० कारचा उपयोग करुन हा स्फोट घडवण्यात आला.  सीसीटीव्ही फूटेजनुसार ही कार दुपारी ३.१९ मिनिटांनी लाल किल्ला परिसरातील पार्किंगमध्ये आली होती. त्यानंतर संध्याकाळी ६.४८ वाजता कार निघून लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ आली. त्यानंतर या कारचा भयावह स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झालं. मोठ्या आवाजानंतर शरीराचे अवयव दूरवर फेकले गेले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Culprits won't be spared, vows PM Modi

Web Summary : PM Modi vows strict action after Delhi blast kills 12. Investigations are underway to find perpetrators. Rajnath Singh assures thorough probe, promising accountability. Car bomb caused devastation near Red Fort.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBlastस्फोट