शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कोण कापतंय महिलांची वेणी? जाणून घ्या 'चोटी गँग'च्या 5 रहस्यमय गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 2:51 PM

राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  

नवी दिल्ली, दि. 3 - राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथे महिलांना बेशुद्ध करुन रहस्यमयरित्या त्यांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील रहस्यमय बाब अशी आहे की बहुतांश महिलांनी असेच सांगितले आहे की त्यांना बेशुद्ध करुन वेणी कापली जात आहे.  वेणी कापणारी व्यक्ती कोण आहे? कशी दिसते? याबाबतची माहिती अद्याप कुणालाही समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत. प्रकरणाचा छडा लावण्यात   त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्यासमोरील एक आव्हान बनले आहे. दरम्यान, आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणं समोर आली आहेत. 

चोटी गँगच्या 5 रहस्यमय गोष्टी  1. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी राजस्थानमधील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या. यानंतर हरियाणातील झज्जर, मेवात, रोहतक अन्य जिल्ह्यांतील गावांमध्ये महिलांची वेणी कापली जाऊ लागली. हळू-हळू ही घटना गुरुग्राम आणि दिल्लीतील गावांमध्ये घडू लागल्या. 

2. या प्रकरणाचा तपास करणा-या पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी कोणताही पुरावा मिळत नाही. महिलांच्या मेडिकल टेस्टमध्येही कोणतीही असामान्य अशा गोष्टीही आढळून आलेल्या नाहीत. शिवाय, महिलांसोबत असणा-या किंवा राहणा-या एकाही व्यक्तीनं  वेणी कापणा-या व्यक्तीला पाहिलेले नाही. 

 3. सर्व जण आपापल्या म्हणण्यानुसार या घटनेमागे वेगवेगळे अंदाज लावत आहेत. कुणी म्हणत आहे की यामागे एखाद्या टोळीचा हात असेल तर तांत्रिक-मांत्रिकाचाही हात असल्याचे काहींचं म्हणणे आहे. 

4. दरम्यान, वेणी कापण्याच्या घटनेमागे नेमके कोण आहे? याची ठोस माहिती किंवा एखादा पुरावा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. मात्र यावरुन लोकांमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 

5. आतापर्यंत या घटनेतील 50 प्रकरणे समोर आली आहेत. ताजं उदाहरण द्यायचे झाले तर रविवारी ( 30 जुलै ) दिल्लीतील कगनहेरी गावातील विमलेश आणि मनोज यांच्या आईंची वेणी कापण्यात आली. विमलेशनं सांगितले की, रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आईचे डोके अचानक दुखू लागले, यामुळे ती झोपून गेली.  तिला जाग आल्यानंतर तिनं पाहिलं की कुणी तरी तिची वेणी कापली आहे.  अशाच पद्धतीने मनोजच्या आईचीही वेणी दोनदा कापण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशत पसरली आहे.  

धक्कादायक ! वेणी कापणारी चेटकीण समजून झालेल्या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू

दरम्यान,  उत्तर प्रदेशातही अशा प्रकारची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या घटनेची माहिती मिळताच काही जणांनी एका वृद्ध महिलेला वेणी कापणारी चेटकीण समजून तिला जबर मारहाण केली. या वृद्ध महिलेला एवढी मारहाण करण्यात आली की तिचा यात मृत्यू झाला.  आग्रामधील फतेहबाद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

फतेहबादमधील मगटई गावात रात्री उशीरा एका महिलेची वेणी कापली गेली होती. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर एका वृद्ध महिलेला फिरताना पाहून स्थानिकांनी तिच्यावर संशय घेतला. या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता.  

मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव माना देवी असे होते. त्या शौचास गेलेल्या त्या रात्रीच्या अंधारात रस्ता भरकटल्या व दुस-या वस्तीत पोहोचल्या. यावेळी एका तरुणीने त्यांना पाहताच आरडाओरड सुरू केला. आरडाओरड ऐकून गावकरी जमा झाले आणि चेटकीण असल्याचं समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला आणि न्यायाची मागणी केली. आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीय करत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण?देशातील चार राज्यांमध्ये महिलांची वेणी कापणाऱ्या मांजरीची दहशत पसरली आहे. उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये महिलांनी अनोखळी व्यक्तीकडून त्यांचे केस कापण्यात येत आहेत असा दावा केला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 17 अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 5 आणि दिल्लीमध्ये 3 घटना घडल्या आहेत. महिलांचे केस कापल्याच्या या घटनांचा छडा लावण्यास पोलीस आणि प्रशासनला अद्याप यश आले नाही. 

घराबाहेर लटकवले लिंबू, कांदे आणि नीम काही ठिकाणी या घटनेला अंधश्रद्धेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खासकरुन छोट्या गावांमध्ये हा प्रकार भानामतीचा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील लोकांनी आपल्या घराबाहेर लिंबू, कांदे आणि नीम यांसारख्या वस्तू लटकवल्या आहेत. उत्तरप्रदेशातील मथुरामध्ये नगला शीशराम गावातील लोकांनी घराच्या दरवाज्यावर कांदे लावले आहेत. 

महिलांनी वेणी बांधणंच दिले सोडून केस कापण्याच्या अशा घटनांमुळे काही भागातल्या महिलांनी वेणी बांधणंच सोडून दिल्याचे सांगण्याच येते. इतकंच नाही, तर दिवस मावळल्यानंतर महिला घरातून बाहेर पडत नाहीत.