शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

By राकेशजोशी | Updated: May 25, 2024 13:12 IST

राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

चंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरयाणात घडलेल्या राजकीय उलथापालथी, प्रचारावेळी अनेक ठिकाणी झालेला विरोध पाहता यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २०१९ प्रमाणे विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी आहे. जननायक जनता पक्ष (जेजेपी)ही रिंगणात आहे. राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपापुढे आव्हानांचा डोंगर कायम राहिला. शेतकरी आंदोलनाची हाताळणी, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वादळ, निवडणूक तोंडावर आली असताना मनोहरलाल खट्टर यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अशा गर्तेत अडकलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीसारखी कामगिरी यंदाही करता येईल का, याचीच उत्सुकता आहे. 

जातीय समीकरण महत्त्वाचे२०१९ च्या निवडणुकीत गैर-जाट सवर्णांची ७४ टक्के मते भाजपला गेली. काँग्रेसला १८ टक्के मते मिळाली. ५० टक्के जाट मतदारांनी भाजपला आणि ३३ टक्के काँग्रेसला मतदान केले. मुस्लीम मतांबद्दल बोलायचे झाले तर या समाजाची १४ टक्के मते भाजपकडे गेली.

‘जेजेपी’ आणि ‘आयएनएलडी’च्या कामगिरीकडे लक्षnहरयाणा एक असे राज्य आहे जिथे २०१४ नंतरच भाजप विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर मजबूत स्थितीत आला; परंतु काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आहे. शेतकरी आंदोलन हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे.nत्यामुळे जननायक जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावतात हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

या विषयांवर होतेय निवडणूकयावेळची निवडणूक अनेक अंगांनी बदलली आहे. शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजनेला विरोध, याचे परिणाम निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. तरुणांच्या संतापाचे मतांमध्ये रूपांतर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हरयाणात काँग्रेस आणि आप यांची युती आहे. आप कुरुक्षेत्रामधून नशीब आजमावित आहे. अनेक जागांवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. रोहतक, सिरसा आणि सोनिपतमध्ये भाजप नेत्यांना घाम गाळावा लागत आहे. कर्नाल, गुरुग्राम आणि फरिदाबाद या जागा काँग्रेससाठी आव्हानात्मक आहेत. अंबाला, हिसार, भिवानी-महेंद्रगड येथे चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :haryana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Haryanaहरयाणाcongressकाँग्रेसBJPभाजपा