शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:28 IST

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..."

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. "आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण भाजपची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहे,' असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? पीके म्हणाले, त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयू यांच्यावरही भाष्य केले. पीके म्हणाले, विरोधकांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी भाजपने नितीश यांना आपल्यासोबत घेतले आहे. भाजपने तर यापूर्वीच जेडीयूला गिळंकृत केले आहे. हे नितीश यांनाही माहीत आहे. मात्र, जे काही शिल्लक आहे, त्याच्या सहाय्याने आणखी काही वेळ त्यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे आहे. ते गत 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्प आहे. 

राहुल गांधींच्या यात्रेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह -प्रशांत किशोर म्हणाले, नरेंद्र मोदी सातत्याने आपली छबी बदलतात, यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. यावेळी पीके यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सातत्याने काँग्रेसला नव्या अवतारात येण्याचा सल्ला देत आलो आहे. ते कधी राफेलबद्दल बोलता तर कधी हिंदुत्वावर बोलतात. असे करून चालणार नाही. तुम्हाला एक मुद्दा घ्यावा लागेल आणि संदेश द्यावा लागेल. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस